Lockdown: नागरिकांना गावी जाण्साठी गृह मंत्रालयाची नियमावली; 1 मे 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE
बातम्या
Poonam Poyrekar
|
May 01, 2020 11:10 PM IST
महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (B S Koshyari) यांनी विधानपरिषदेच्या रिक्त 9 जागांसाठी निवडणूक घेण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली होती. त्यानुसार या रिक्त असलेल्या 9 जागांवरील निवडणुकांबाबत भारतीय निवडणूक आयोगाची बैठक आज पार पडणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोड़ा हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या बैठकीत सहभागी होणार असल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधिमंडळ सदस्यत्वाचा प्रश्न निर्माण झाला असून घटनात्मक पेचही उद्भवला आहे. हा पेच सोडविण्यासाठी महाविकासआघाडी सरकारमधील नेते आणि मंत्री प्रयत्न करत आहेत. अशात राज्यपालांची भूमिका महत्त्वाची ठरली आहे. राज्यपाल काय भूमिका घेतात यावर महविकासआघाडी सरकारचे भवितव्य अवलबून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
तर दुसरीकडे कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली असून भारतात सद्य स्थितीत कोरोना संक्रमितांची एकूण संख्या 33,610 वर पोहोचली आहे. यात 8373 इतके रुग्ण बरे झाले असून 1075 रुग्णांचा मृत्यू झाला आहे अशी माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
तर महाराष्ट्रात एकूण रुग्ण संख्या 10,498 झाली आहे. आज राज्यात एकूण 27 लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 1773 लोकांना बरे झाल्यानंतर सोडण्यात आले आहे, त्या पैकी आज 180 जणांना सोडण्यात आले. तर मुंबईत एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 6,874 इतकी झाली आहे.