Lockdown: लॉकडाऊन कालावधी 2 आठवड्यांनी वाढविण्यात आला, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
Lockdown | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

देशभरात लागू असलेला लॉकडाऊन (Lockdown) आणखी 2 आठवड्यांनी वाढविण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने (Ministry of Home Affairs) जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यातील, देशातील लॉकडाऊन 17 मे पर्यंत कायम राहणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 24 मार्च या दिवशी पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर केला. हा लॉकडाऊन 21 दिवसांचा होता. त्यामुळे तो 21 दिवसांनंतर संपुष्टात येईल असे वाटत असतानाच तो पुढे 3 मे पर्यंत वाढविण्यात आला. आता 3 मे नंतर पुढे काय होणार याबाबत उत्सुकता होती. अखेर ही उत्सुकता संपुष्टात आली असून, हा लॉकडाऊन 4 मे 2020 पासून पुढे 2 आठवड्यांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.

लॉकडाऊन कालावधी वाढविण्यात येत असला तरी, काही गोष्टीं शिथिल करण्यात आल्या आहेत. देशातील विविध राज्यांतील जिल्ह्यांची एकूण तिन गटांमध्ये विभागणी करण्या आली आहे. यात रेड, ऑरेंज आणि ग्रीन अशा तीन गटांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील राज्यात 14 जिल्हे रेड आणि 16 ऑरेंज तर, 6 जिल्ह्यांचा ग्रीन झोनमध्ये आहेत. लॉकडाऊन काळात कोणता जिल्हा कोणत्या झोनमध्ये आहे त्यावर लॉकडाऊन किती शिथील करणारा याबाबत निर्णय होणार आहे.

एएनआय ट्वि

लॉकडाऊन कालावधीत काहीशी शिथिलता देण्यात आली असली तरी, नागरिकांनी घरातच थांबायचे आहे. राज्यातील रेल्वे, रस्ते आणि विमान वाहतूक बंद राहणार आहे. या सोबतच सर्व धर्मिक स्थळे, सिनेमागृह, नाट्यगृह, तरणतलाव बंद राहणार आहे. अपवाद केवळ परराज्यांमध्ये अडकलेले नागरिक, विद्यार्थी यांना त्यांच्या मूळ राज्यांमध्ये पाठविण्यासाठी विशेष रेल्वे सेवा सुरु करण्यात येणार आहेत.