Union Finance Minister Nirmala Sitharaman। Photo Credits: Twitter/ ANI

अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आज सकाळी संसदेमध्ये राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे अभिभाषण झाल्यानंतर लोकसभेत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आर्थिक सर्वेक्षण अहवाल 2021  (Economic Survey 2020-21) मांडला आहे. हा अहवाल देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार कृष्णमूर्ती सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली तयार करण्यात आला आहे. या अहवालात देण्यात आलेल्या माहितीनुसार, कोरोना संकटामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला फटका आहे. चालू आर्थिक वर्षामध्ये विकासदर -7,7% असेल. तर वित्तीय तूट जीडीपीच्या 7.25% असेल. मात्र अर्थवस्थेचा पुढील वर्षाचा म्हणजे 2021-22 चा जीडीपी ग्रोथ रेट हा 11% असेल अशी आशा व्यक्त करण्यात आली आहे. सर्वेक्षण अहवाल म्हणजे काय? काय आहेत अपेक्षा.

दरवर्षी बजेट सादर करण्यापूर्वी आर्थिक सर्व्हेक्षण अहवाल सादर करण्याची प्रथा आहे. त्यानुसार आज सादर आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात आगामी काळात अर्थव्यवस्था V आकारात उसळी घेईल असे सांगण्यात आले आहे. म्हणजे ज्या वेगाने ती खाली आली त्याच वेगाने वर जाईल असा अंदाज आहे. थोड्याच वेळात म्हणजे आज दुपारी 3.30 च्या सुमारास मुख्य आर्थिक सल्लागार, निर्मला सीतारमण एक पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती देणार आहे. Budget 2021: नव्या अर्थसंकल्पात फर्नीचर, फ्रिज, वॉशिंग मशीन बद्दल मोठी घोषणा होण्याची शक्यता; पहा काय होणार स्वस्त आणि काय महाग.

आज आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर झाल्यानंतर आता 1 फेब्रुवारी 2021 ला देशाचा अर्थसंकल्प 2021 सादर केला जाणार आहे. आर्थिक सर्व्हेक्षण हा अर्थव्यवस्थेचा अधिकृत वार्षिक अहवाल म्हणून मांडला जातो. यामध्ये भविष्यातील योजना आणि देशातील अर्थव्यवस्थेसमोरील आव्हानांचा लेखाजोखा मांडला जातो. यामध्ये देशाच्या आर्थिक विकासाचा अंदाज मांडला जातो. या सर्वेक्षणाच्या आधारेच सरकार बजेट सादर करत असते. त्यामुळे हा आर्थिक सर्वेक्षण अहवाल महत्त्वाचा आहे.