अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Union Finance Minister Nirmala Sitharaman) यांनी आज चौथ्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प (Union Budget) संसदेमध्ये मांडला आहे. भारतामध्ये कोविड 19 संकटाचा प्रभाव यंदादेखील जाणवला आहे. सरकारचा सामान्य नागरिकांच्या सक्षमीकरणावर भर असल्याचं सांगत त्यांनी काही घोषणा जाहीर केल्या आहेत. या अर्थसंकल्पात स्वातंत्र्याच्या शंभर वर्षांचा दृष्टिकोन मांडण्यात आला आहे. आगामी 25 वर्ष लक्षात घेऊन या अर्थसंकल्पात तरतुदी असतील असं अर्थमंत्र्यांनी सांगितलं आहे. हे देखील नक्की वाचा: Budget 2022 Live Streaming: आज सादर होणार केंद्रीय अर्थसंकल्प; इथे पहा थेट प्रक्षेपण.
वन क्लास वन टीव्ही चॅनल
वन क्लास वन टीव्ही चॅनल कार्यक्रम अंतर्गत PM eVIDYA मिळणार आहे. यामध्ये पहिली ते 12वीच्या विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषेतून शिक्षणासाठी खास टीव्ही चॅनेल सुरू होतील.
PM Gati Shakti Master Plan
एक्सप्रेस वे साठी काम केले जाणार आहेत. NH network 25 हजार किमी पर्यंत वाढवला जाईल.
कृषी क्षेत्रातील स्टार्ट्अपला चालना
कृषी क्षेत्रातील स्टार्ट्अपला चालना सरकार कडून दिली जाणार आहे. नाबार्ड कडून आर्थिक मदतही दिली जाणार आहे.
E-passports
2022-23 मध्ये नागरिकांना E-passports दिले जाणार आहेत. या पासपोर्टमध्ये ई चीप्स असतील.
मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी खास कार्यक्रम
मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी आता सरकार एक पाऊल पुढे येणार आहे. हा आबालवृद्धांसाठी असेल.
पोस्ट ऑफिसमध्ये कोअर बँकिंग प्रणाली
2022 मध्ये 1.5 लाख पोस्ट ऑफिसमध्ये कोअर बँकिंग प्रणाली 100% पूर्ण होईल. सीमावर्ती गावांमध्ये पायाभूत सुविधांच्या विकासासाठी व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रम व्यावसायिक बँका 75 जिल्ह्यांमध्ये 75 डिजिटल बँकिंग युनिट सुरू करणार आहेत.
इलेक्ट्रिक वाहन तरतुदी
#अर्थसंकल्प २०२२-२३
इलेक्ट्रिक वाहन तरतुदी @DDNewslive @nsitharaman @FinMinIndia
#Budget2022 #Budget #UnionBudget2022 #AatmaNirbharBharatKaBudget pic.twitter.com/bOr1DXSCOG
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) February 1, 2022
संरक्षण क्षेत्र आत्मनिर्भर होणार
#अर्थसंकल्प २०२२-२३
संरक्षण क्षेत्रातल्या तरतुदी @DDNewslive @nsitharaman @FinMinIndia
#Budget2022 #Budget #UnionBudget2022 #AatmaNirbharBharatKaBudget pic.twitter.com/9KcfzWJFox
— DD Sahyadri News | सह्याद्री बातम्या (@ddsahyadrinews) February 1, 2022
डिजिटल रूपी
आरबीआय कडून 2022-23 मध्ये Digital rupee आणले जाणार आहे. यामध्ये blockchain technology वापरली जाणार आहे.
टॅक्स बद्दलचे अपडेट्स
आयटी रिटर्न भरल्यानंतर त्यामध्ये काही बदल करण्यासाठी 2 वर्षांचा कालावधी मिळणार आहे. virtual digital asset वरील इन्कमवर आता 30% टॅक्स द्यावा लागणार आहे. तर कॉर्पोरेट टॅक्स 18 टक्क्यांवरून 15 टक्के करण्यात आली आहे. दरम्यान सलग सहाव्या वर्षी इन्कम टॅक्स स्लॅब मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
काळानुरूप अर्थसंकल्प सादर करण्याच्या रीती-परंपरा बदलल्या आहेत. 'Bahi Khata'ऐवजी यंदा अर्थसंकल्प टॅब वर वाचला गेला. सलग दुसऱ्यांदा संसदेत कागदविरहित अर्थसंकल्प सादर झाला. काल जाहीर झालेल्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवलामध्ये चालू आर्थिक वर्षासाठी 9.2 टक्के जीडीपीचा अंदाज व्यक्त केला असून पुढील आर्थिक वर्षात तो 8 ते 8.5 टक्के राहील, असा अंदाज या अहवालामध्ये मांडण्यात आला आहे.