आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण केंद्रीय अर्थसंकल्प संसदेमध्ये सादर करणार आहेत. सकाळी 11 वाजता अर्थसंकल्पाच्या वाचनाला सुरूवात होणार आहे. काल आर्थिक सर्वेक्षण अहवाल सादर केल्यानंतर आज सादर होणार्या बजेट कडून सर्वसामान्यांना आशा आहेत. करदाते, शेतकरी, आरोग्य यंत्रणा या बाबत यंदाच्या बजेटमध्ये काय घोषणा होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. मग हा अर्थसंकल्प ऑनलाईन थेट पाहण्यासाठी तुम्ही डीडी च्या अधिकृत युट्युब चॅनेलला भेट देऊ शकता. केंद्रीय अर्थसंकल्प 2022 लोकसभा टीव्हीवर थेट प्रक्षेपित केला जाईल. याशिवाय डीडी न्यूजवर लाइव्ह देखील पाहता येईल. अर्थसंकल्प त्यांच्या यूट्यूब चॅनेलवरही लाइव्ह दाखवण्यात येईल.
अर्थसंंकल्प 2022 थेट प्रक्षेपण
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)