Union Budget 2020 Highlights: अर्थमंत्री निर्मला सीतारमण कडून अर्थसंकल्प जाहीर; जाणून घ्या अशा गोष्टी ज्यांचा तुमच्यावर होणार परिणाम

Union Budget 2020 Highlights: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण आज लोकसभेत मोदी सरकारच्या 2.0 मधील दुसरे बजेट सादर करत आहेत. देशातील अर्थव्यवस्थेमधील सुस्ती दरम्यान मोदी सरकारसाठी हे बजेट अतिशय महत्वपूर्ण असणार आहे. बजेट सादर करताना निर्मला सीतारमण यांनी सर्वात प्रथम लोकसभा निवडणूक 2019 च्या मुद्द्यावर आपले मत व्यक्त कले. तसेच लोकसभा निवडणूकीत मोदी सरकारला बहुमत मिळाले होते. देशाच्या जनतेचा मोदी सरकारवर भरोसा असल्याचा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे. हे बजेट देशाच्या महत्वकांक्षा पूर्ण करणारे बजेट ठरणार आहे.

अर्थमंत्री यांनी असे म्हटले आहे की, आमच्या सरकारची साथ, सर्वांचा विकास आणि सर्वांचा विकास या उद्देशनुसार आम्ही कामे करणार आहोत. 2014 ते 2019 दरम्यान मोदी सरकारच्या धोरणामुळे 284 बिलियन डॉलर्स एवढी आपली गुंतवणूक वाढल्याने उद्योगाला चालना मिळाली आहे. भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असल्याचे सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना म्हटले आहे.

>>शिक्षण क्षेत्रासाठी 99,300 करोड रुपयांची तरतूद:

बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शिक्षण क्षेत्रासाठी 99,300 करोड रुपयांची तरतूद केली आहे. विदेशी विद्यार्थ्यांसाठी स्टडी इन इंडिया योजना सुरु करणार आहे. नॅशनल फॉरेन्सिक सायन्स विद्यापीठाची निर्मिती करणार आहे.

>>कृषि उडान सेवा:

निर्मला सीतारमण यांनी महिला बचत गटांना चालना देत कृषी उडाण योजना सुरु करणार यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल देशातील विविध भागात पोहचवता येणार आहे. मासे, फळभाज्या आणि पालेभाज्या यांच्यासाठी वाहतुकीसाठी रेल्वेची सोय केली जाणार आहे.

>> अर्थमंत्री यांना बजेट सादर करताना दिवंगत अरुण जेटली यांची आठवण

बजेट सादर करताना निर्मला सीतारमण यांनी जीएसटी कर प्रणाली सारखा महत्वपूर्ण निर्णयाची घोषणा करणाऱ्या अरुण जेटली यांची आठवण काढली आहे. तसेच यावेळी त्यांनी जेटली यांना श्रद्धांजली दिली आहे. देशातील नागरिकांच्या सेवेसाठी आमच्या सरकारने एक देश एक टॅक्स कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

>>GST मध्ये वाढ

जीएसटी दर कमी होत असल्याने प्रत्येक परिवाराची महिन्याभरासाठी 4 टक्के बचत होत आहे. जीएसटी इन्स्पेक्टरचे राज्य आता संपले आहे. आम्ही 60 लाखांपेक्षा अधिक टॅक्सपेअर जोडले आहेत. जीएसटी काउंसिलकडून नागरिकांच्या समस्या समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जीएसटीच्या कलेक्शनमध्ये सातत्याने वाढ होत असून नुकताच 1 लाख कोटींचा आकडा पार केला आहे.

> >जम्मू-कश्मीर वर शेरोशायरी:

"हमारा वतन खिलते हुए शालीमार बाग जैसे, हमारा वतन डल झील में खिलते हुए कमल जैसा, नौजवानों के गर्म खून जैसा, मेरा वतन-तेरा वतन-हमारा वतन-दुनिया का सबसे प्यारा वतन." हा शेर वाचून दाखवला.

>>'या' 3 केंद्रांवर मुख्य लक्ष असणार

अर्थमंत्र्यांनी असे म्हटले आहे की, केंद्र सरकारवरी कर्जाचा बोझा 48.7 टक्क्यांवर आला आहे. यामुळे बजेटमध्ये आशादायी भारत, आर्थिक सुधारणा आणि केयरिंग समाज या तीन मुख्य केंद्रावर लक्ष असणार आहे.

>>शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरणार बजेट

शेती, ग्रामविकास आणि सिंचन हे केंद्रस्थानी, शेतकऱ्यांचे इनकम डबल होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच 6.11 करोड शेतकऱ्यांपर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून पोहचलो आहोत. प्रधानमंत्री किसान योजनेमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहचवण्यात यश आले आहे.शेती, ग्रामविकासाठी 3 लाख कोटींची तरतूद करण्यात आली आहे.(Agriculture Budget 2020 Highlights: केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये शेतक-यांसाठी करण्यात आली 15 लाख कोटींच्या कर्जाची तरतूद; पाहा कृषी क्षेत्रासाठी या बजेटमध्ये आणखी काय मिळाले ते)

>>वैद्यकिय योजनांसाठी 70 हजार कोटी रुपयांची तरतूद

पीपीपी मॉडेलद्वारे नव्या रुग्णालयांची निर्मिती करण्यात येणार आहे. टीबीचा समूळ नायनाट करण्यासाठी प्रयत्न सरकार करणार आहे. आयुषमान भारत योजनेअंतर्गत रुग्णालयांची संख्या वाढवण्यात येणार आहे.

>>यंदाच्या बजेट मध्ये भारतीय रेल्वेला  मिळणार 'या' सुविधा

सबका साथ, सबका विकास वर सरकारचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. रेल्वे स्टेशन डिव्हलेपमेंट मोदी सरकार करणार आहे. तसेच दिल्ली-मुंबई एक्सप्रेस वे मार्गाचे काम वर्ष 2023 पर्यंत पूर्ण करण्यासोबत 2000 किमीचे किनारी रस्ते तयार केले जाणार आहेत.(Railway Budget 2020 Highlights: यंदाच्या बजेट मध्ये भारतीय रेल्वेला कोणत्या मिळाल्या सुविधा, येथे पहा)

>>केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून करदात्यांना दिलासा

केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून करदात्यांना दिलासा देण्यात आला आहे. त्यानुसार अडीच लाख उत्पन्नावर कोणताही कर नाही पण 2.5 ते 5 लाखापर्यंत 5 टक्के कर द्यावा लागणार आहे. 5 ते 7.5 लाख उत्पन्नावर 10 टक्के कर, 7.5 ते 10 लाख वेतन 15 टक्के कर, 10 ते 12 लाख उत्पन्नावर 20 टक्के कर, 12.5 ते 15 लाख पर्यंत 25 टक्के कर आणि 12.5 ते 15 लाख पर्यंत 25 टक्के कर भरावा लागणार आहे.