Agriculture Budget 2020-21 Highlights: सरकारकडून सादर करण्यात येणा-या केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये आपल्यासाठी काय विशेष तरतूद करण्यात येईल याकडे कान लावून बसलेल्या बळीराजासाठी आजचा दिवस खूप मोठा होता. संसदेत सादर झालेल्या केंद्रीय अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कृषी क्षेत्रासाठी तसेच शेतक-यांसाठी अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्या सर्वात मोठी घोषणा म्हणजे शेतक-यांसाठी 15 लाख कोटींच्या कर्जाची तरतूद करण्यात आली आहे. मात्र हा निर्णय शेतक-यांसाठी किती फायदेशीर ठरतो ते येणा-या काही दिवसांत कळेल. या घोषणेव्यतिरिक्त अन्य ब-याच घोषणा यावेळी करण्यात आल्या.
शेती, ग्रामविकास आणि सिंचन हे केंद्रस्थानी, शेतकऱ्यांचे इनकम डबल होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तसेच 6.11 करोड शेतकऱ्यांपर्यंत विविध योजनांच्या माध्यमातून पोहचलो आहोत. प्रधानमंत्री किसान योजनेमार्फत शेतकऱ्यांपर्यंत पैसे पोहचवण्यात यश आले आहे.
पाहूयात कृषी क्षेत्रासाठी काय देण्यात आले 2020 च्या अर्थसंकल्पामध्ये:
1) सौरउर्जेवरील शेतीपंप सुरु केले, अजून 15 लाख शेतकऱ्यांना सोलार पंप देणार
2) नापीक जमिनीवर सौर प्रकल्प उभारण्याची योजना
3) पाण्याची कमतरता असलेल्या 100 जिल्ह्यांमध्ये काम करणार
4) सेंद्रिय खत वापरण्यासाठी प्रयत्न करणार
5) महिला बचत गटांना चालना देत कृषी उडाण योजना सुरु करणार यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल देशातील विविध भागात पोहचवता येईल Budget 2020: बजेट सादर होण्यापूर्वी सरकारला दिलासा, 1 कोटींच्या पार GST वसूल
6) केंद्रीय शेतीवर भर, कुसुम योजनेद्वारे शेतकऱ्यांना सोलार पंप देणार
7) 6.11 कोटी शेतकऱ्यांना विमा योजनेचा लाभ घेता येणार
8) झिरो बजेटवर शेतीवर सरकारचा भर असणार आहे
9) मासे, फळभाज्या आणि पालेभाज्या यांच्यासाठी वाहतुकीसाठी रेल्वेची सोय
10) दूध, मांस आणि माशांसाठी किसान रेल चावली जाणार
11) जिल्हा स्तरावर फळबागा विकासासाठी प्रोत्साहन देणार
12) शेती, ग्रामविकासाठी 3 लाख कोटींची तरतूद करणार
13) 2025 पर्यंत दूध उत्पादन दुप्पट करणार, दूध उत्पादकांसाठी ही खास योजना असणार आहे.
सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात कृषी विभागाला देण्यात आलेल्या सवलती वा करण्यात आलेल्या तरतुदी या नक्कीच कौतुकास्पद वाटत असल्या तरी त्या बळीराजाला याचा कितपद फायदा होतो हे येणा-या काही दिवसांता कळेल.