Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
30 minutes ago

Budget 2019 Live News Updates: पेट्रोल, डिझेल, सोनं महागणार

News टीम लेटेस्टली | Jul 05, 2019 01:09 PM IST
A+
A-
05 Jul, 13:09 (IST)

 पेट्रोल, डिझेल, सोनं महागणार .  मौल्यवान रत्न, सोन्यावर कस्टम ड्युटी वाढवली 

05 Jul, 13:04 (IST)

5 लाख रूपये पर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल. 2-5 आणि 5 कोटी वर उत्पन्न असणार्‍यांवर सरचार्ज लावला जाईल.  सर्वाधिक 7% सरचार्ज भरावा लागेल. उद्योजकांना GST मुळे 17 टॅक्स बंद करून 1 टॅक्स आकारला जाणार. त्यामुळे वेळेची बचत.

05 Jul, 12:56 (IST)

पॅनकार्ड नसेल तर आधार कार्डच्या माध्यमातून टॅक्स भरता येणार.  

05 Jul, 12:50 (IST)

15 वर्षासाठी गृहकर्ज घेतल्यास सुमारे 7 लाख रूपायंचा फायदा मिळेल.  दीड लाखाची सूट जाहीर 

05 Jul, 12:47 (IST)

 400 कोटी टर्न ओव्हर असणार्‍यांना 25% टॅक्स. Direct Tax मध्ये  78% वाढ. घर, विकास आणि स्टार्ट अप साठी फायदेशीर. 

05 Jul, 12:28 (IST)

सार्वजनिक क्षेत्रातील म्हणजे सरकारी बँकांना सुधारणांसाठी ७० हजार कोटींचा निधी देणार. 4 वर्षात 4 लाख कोटी रूपयांची वसुली करण्यात  आली आहे. 

05 Jul, 12:21 (IST)

शेअर बाजार नाराज, 118.99 पॉईंटने घसरत सेंसेक्स 39,788.65 वर

05 Jul, 12:16 (IST)

भारतीय पासपोर्ट असणार्‍या NRI  ला ताबडतोब मिळणार आधार कार्ड  मिळणार आहे. यापूर्वी 180 दिवस वाट पहावी लागत होती. 

05 Jul, 12:15 (IST)

ग्रामीण  अर्थव्यवस्थेमध्ये महिलांचे योगदान महत्त्वाचे  आहे. मागील 10 वर्षांमध्ये महिलांचा प्रत्येक क्षेत्रातील वावर प्रशंसनीय आहे. महिला उद्योजिका बनवणं हे उद्दिष्ट असल्याची माहिती देण्यात आली आहे. मुद्रा स्कीम अंतर्गत 1 लाख रूपयांचं कर्ज महिलांना मिळणार. 

05 Jul, 12:07 (IST)

स्टॅन्ड अप इंडिया पुढील 5 वर्षही सुरू राहणार. स्टार्ट अप साठी खास वाहिनी सुरू केली जाईल.  त्यावर माहिती दिली जाईल. स्टॅन्ड अप इंडिया द्वारा पाच वर्षामध्ये मोठं यश मिळालं आहे.  मशीन किंवा इतर साहित्यासाठी बॅंका अर्थसहाय्य देणार. 

Load More

Budget 2019 Highlights: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) नव्या मोदी सरकारमध्ये पहिला अर्थसंकल्प मांडणार आहेत. आज सकाळी 11 वाजता लोकसभेत (Lok Sabha) हे बजेट सादर करतील. फेब्रुवारी महिन्यात पियुष गोयल यांनी अंतरिम बजेट सादर केले होते. त्यामुळे आता पुढील वर्षभरासाठी सरकार आज सादर होणार्‍या अर्थसंकल्पामध्ये कोणकोणत्या घोषणा करणार हे पाहणं उत्सुकतेचं आहे. अर्थव्यवस्थेला गतीमान बनवणं आणि आर्थिक सुधारणांना वेग देण्यासाठी अर्थसंकल्पात महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्था मजबूत बनवण्यासोबत जनतेला दिलेली आश्वासन पूर्ण करण्याचं लक्ष्य आता मोदी सरकार समोर असेल. भारताचा अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी तो लाल रंगाच्या लेदर बॅग मधूनच आणण्यामागे आहे 159 वर्ष जूनी कहाणी, कशी सुरू झाली ही प्रथा?

2019-20साठी देशाचा आर्थिक विकास दर (GDP) 7 टक्के असू शकतो. असं आर्थिक सर्वेक्षणामध्ये सांगण्यात आलं आहे. आर्थिक सर्वेत परदेशी गुंतवणूक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्रात आगामी काही महिन्यातच विधानसभा निवडणूका असल्याने आता शेतकरी, पाणीसंकट, सामान्य नोकरदार आणि उद्योजकांसाठी खास घोषणा होण्याची शक्यता आहे. करदात्यांना सवलत मिळू शकते. त्यामुळे सामान्यांचेही आजच्या अर्थसंकल्पाकडे डोळे लागून राहिले आहेत.निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्यातील शेतकरी ते नोकरदार व्यक्तींसाठी होऊ शकतात 'या' मोठ्या घोषणा

निर्मला सीतारमण मोदी सरकारमध्ये आधी संरक्षणमंत्री होत्या आणि आता नव्या सरकारमध्ये अर्थमंत्री पद सांभाळत आहेत त्यामुळे त्यांच्या भाषणाकडे लक्ष लागून राहिले आहे. लोकसभेत केंद्रीय अर्थसंकल्प मांडणार्‍या निर्मला सीतारमण या पहिल्या महिला अर्थमंत्री आहेत.


Show Full Article Share Now