Budget 2019 सादर होण्यापूर्वी Sensex मध्ये वाढ; गाठला 40,027.21 चा टप्पा
शेअर बाजार (Photo Credits: PTI)

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण (Nirmala Sitharaman) आज 2019-20 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प सादर करणार आहेत. फेब्रुवारी 2019 मध्ये सरकारने आगामी निवडणूक लक्षात घेत पीयुष गोयल (Piyush Goel) यांनी अंतरिम बजेट सादर केलं होतं. त्यानंतर पुन्हा एकदा सत्तेत आलेले मोदी सरकार पुढील वर्षभरासाठी नवा अर्थसंकल्प सादर करणार आहे.

अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वीच शेअर बाजारात उलाढाली व्हायला सुरुवात झाली आहे. सेन्सेक्समध्ये 119.15 अंकांनी वाढ झाली असून तो 40,027.21 वर पोहचला आहे. (अर्थसंकल्पातील लाईव्ह अपडेट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)

ANI ट्विट:

मोदी सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्याने स्थिरावलेल्या सरकारकडून शेतकरी, नोकरदार, महिला, उद्योगपती तसंच सामान्य जनतेच्या बऱ्याच अपेक्षा आहेत. आगामी काळात महाराष्ट्रसह इतर राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणूका लक्षात घेऊन मोदी सरकार अर्थसंकल्पात काय खास घोषणा करणार याकडे देशाचे लक्ष लागले आहे.