Education | Image Used For Representational purpose Only (Photo Credits: Pixabay.com)

UGC to Universities: विद्यापीठ अनुदान आयोग (University Grants Commission) म्हणजेच यूजीसी (UGC) द्वारा विद्यापीठांना (Universities) सांगण्यात आले आहे की, भलेही अभ्यासक्रम इंग्रजी भाषेत/माध्यमात (English Medium) असेल तरीही विद्यार्थ्यांना परीक्षा मात्र स्थानिक भाषांमध्ये देण्याची परवानगी देण्यात यावी. यूजीसी अध्यक्ष जगदेश कुमार (Jagadesh Kumar) यांच्या हवाल्याने पीटीआयने याबाबत माहिती दिली आहे. जगदेश कुमार म्हणाले की, यूजीसीने विद्यापीठांना इंग्रजी माध्यमात अभ्यासक्रम ऑफर केला असला तरीही विद्यार्थ्यांना स्थानिक भाषांमध्ये परीक्षा लिहिण्याची परवानगी देण्यास सांगण्यात आले आहे.

उच्च शिक्षण संस्था पाठ्यपुस्तके तयार करण्यात आणि मातृभाषा/स्थानिक भाषांमध्ये अध्यापन-अध्यापन प्रक्रियेला पाठिंबा देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे स्थानिक भाषा बळकट व्हायला हव्या आहेत. म्हणूनच आयोगाने या प्रयत्नांना बळकट करणे आणि ''मातृभाषा/स्थानिक भाषांमध्ये पाठ्यपुस्तके लिहिणे आणि इतर भाषांमधील मानक पुस्तकांचे भाषांतर करण्यासह त्यांचा अध्यापनात वापर करण्यास प्रोत्साहन देणे'' यासारख्या उपक्रमांना चालना देण्यावर भर दिला आहे.

यूजीसीने विद्यापीठांना सूचवले आहे की, की तुमच्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांना परीक्षांमध्ये स्थानिक भाषांमध्ये उत्तरे लिहिण्याची परवानगी द्यावी. जरी अभ्यासक्रम आणि इतर कार्यक्रम इंग्रजी माध्यमात दिला जात असला तरीही, आणि स्थानिक भाषेतील मूळ लेखनाच्या अनुवादाला प्रोत्साहन द्यावे. तसेच अध्यापनात स्थानिक भाषेचा वापर करावा, विद्यापीठांमध्ये अध्यापनाची प्रक्रियाही सुलभ करावी असे यूजीसीने म्हटले आहे. (हेही वाचा, RTE Admission 2023- 24: आरटीई प्रवेश सुरु, तुमच्या पाल्याची नोंद झाली का? जाणून घ्या तारीक आणि प्रक्रिया)

ट्विट

भारत हा विविधतेत एकता दर्शवणारा देश आहे. त्यामुळे इथली भौगोलिक स्थिती, प्रदेश, आणि संस्कृती आदी गोष्टी पाहता मोठ्या प्रमाणावर भाषिक विविधता आहे. परिणामी इंग्रजी किंवा हिंदी आदी भाषांची सक्ती केल्यास विद्यार्थ्यांच्या नैसर्गिक कलागूण आणि बैद्धीक विकासावर परिणाम होतो, असे मानणारा एक घटक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा एकदा मूळ प्रवाहात आणने आणि एकूणच देसी भाषांना चालना देण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत असल्याे जाणकार सांगतात.