RTE Admission 2023- 24: आरटीई प्रवेश सुरु, तुमच्या पाल्याची नोंद झाली का? जाणून घ्या तारीक आणि प्रक्रिया

Right To Education: शिक्षण हक्क कायदा 2009 अन्वये तुम्ही जर तुमच्या पाल्याला शाळेत प्रवेश घेत असाल. त्यासाठी तुम्ही नोंदणी केली असेल तर आपल्या पाल्याला या नोंदणीनुसार प्रवेश मिळाला आहे किंवा नाही? याबाबत अनेक पालकांमद्ये संभ्रम असतो. हा संभ्रम दूर करण्यासाठी आणि प्रवेश प्रक्रिया शेवटच्या तारखेसह जाणून घेण्यासाठी ही माहिती आपणास उपयोगी ठरु शकते. जाणून घ्या काय आहे आरटीई? म्हणजेच शिक्षण हक्क कायदा आणि त्याचा पाल्यांना कसा होतो फायदा?

शिक्षणाचा अधिकार (RTE) हा 6-14 वयोगटातील सर्व मुलांना भारतीय संविधानाने हमी दिलेला मूलभूत अधिकार आहे. हा कायदा शिक्षण हक्क कायदा 2009 नावाने ओळखला जातो. भारतीय संसदेने 4 ऑगस्ट 2009 रोजी हा कायदा पारित केला. RTE कायदा भारतातील प्रत्येक मुलाला मोफत आणि सक्तीचे शिक्षण अनिवार्य करतो. हा कायदा सरकारने मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे याची खात्री करणे बंधनकारक करतो. (हेही वाचा, SSC GD Constable Exam 2023: आता हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त 13 प्रादेशिक भाषांमध्ये घेण्यात येणार कॉन्स्टेबल (GD) CAPF परीक्षा)

RTE अन्वये नोंदणी झालेल्या विद्यार्थ्यांची नावे 5 एप्रिल 2023 रोजी लॉटरी पद्धतीने जाहीर झाली आहेत. ही नावे 12 एप्रिल 2023 पासून आरटीई पोर्टलवर सुद्धा पाहायला मिळतात. ज्या विद्यार्थ्यांना आरईईअन्वये प्रवेश मिळाला आहे त्या पालकांना मोबालवर मेसेजद्वारेही माहती देण्यात येते. मात्र, कधी कधी काही तांत्रिक अजचणींमुळे मेसेज मिळणे कठीण असते. अशा वेळी मेसेजवर अवलंबून न राहता पालकांनी संकेतस्थळ तपासणे आवश्यक आहे. त्यासाठी आरटीई पोर्टलवर अर्जाची स्थिती या पर्यायावर आपला अर्ज क्रमांक लिहावा. त्यानंतर लॉटरीमध्ये आपल्या पाल्याचा क्रमांक लागला आहे किंवा नाही याबाबत पालकांना माहिती मिळू शकेल.

महाराष्ट्रात rte25admission.maharashtra.gov.in वर आरटीई अंतर्ग प्रकिया ऑनलाईन पार पडली. यंदा राज्याता आरटीई अंतर्गत 25 टक्के राखीव जागांसाठी अर्ज आले. प्रवेश पात्र विद्यार्थी पडताळणी समितीकडे जाऊन आपल्या कागदपत्रांची तपासणी करु शकतात. त्यासाठीची मुदत 13 एप्रिल 2023 पासून 25 एप्रिल 2023 पर्यंतच आहे. याची पालकांनी नोंद घ्यायला हवी.

आरटीई अंतर्गत प्रवेशकर्त्या विद्यार्थ्यांच्या पालकांसाठी सूलभ माहिती

  • https://student.maharashtra.gov.in या वेबसाईटवर जा. तिथे verification committee पर्यायावर क्लिक करा. इथे तुम्हाला पडताळणी केंद्रे पाहायाल मिळतील. आपण आपल्या पसंतीने जवळचे केंद्र निवडू शकता.
  • आरटीई पोर्टलवर प्राप्त झालेले हमीपत्र , एलॉटमेंट लेटर (Allotment Letter) तसेच अर्जात उल्लेखलेल्या सर्व कागदपत्रांच्या मूळ आणि साक्षांकीत प्रति घेऊन पडताळणी समितीशी संपर्क साधावा.
  • पडताळणी समितीला सर्व कागदपत्रांच्या 2 प्रती काढून त्यांचे वेगवेगळे गट समितीला प्रदान करावेत
  • पडताळणी समितीकडे जाऊन कागदपत्रांची तपासणी करुन प्रवेश प्रक्रिया पूर्ण करता येते.
  • पडताळणी समितीकडून पात्र/योग्य शेरा मिळताच प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली असे मानता येते.
  • पडताळणी समितीने जर अपात्र शेरा दिल्यास विद्यार्थ्याचा प्रवेश नाकारला जातो.
  • पडताळणी समितीने शेरा दिल्यावर सदर कागदपत्रे घेऊन पालक अचूक शाळेत गेल्यास सदर शाळेस तो प्रवेश नाकारता येत नाही.
  • शाळेमध्ये प्रत्यक्ष प्रवेश 25 एप्रिल ते 30 एप्रिल दरम्यान मिळणार आहे.