एखाद्या हॉटेल किंवा मॉलच्या बाहेर ग्राहकांच्या गाड्यांसाठी पार्किंगची सोय करण्यात आलेली असते. तसेच पार्किंग कोणत्या ठिकाणी करावी याचे सुद्धा बोर्ड लावण्यात येतात. मात्र काही ठिकाणी ग्राहकाने त्यांच्या जबाबदारीवर गाडी पार्क करावी असे स्पष्ट सांगण्यात येते. त्यामुळेच सुप्रीम कोर्टाने या प्रकरणी एक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. त्यानुसार कोर्टाने असे म्हटले आहे की, हॉटेलच्या पार्किंग मधून जर गाडी चोरी झाल्यास त्याची पूर्ण जबाबदारी हॉटेलची असणार आहे. त्याचसोबत कोर्टाने असे ही म्हटले जर गाडीच्या मालकाने चावी पार्किंग केल्यानंतर हॉटेल स्टाफला दिल्यानंतर गाडी चोरी झाल्यास किंवा काही नुकसान झाल्यास त्यासाठी सुद्धा हॉटेलला त्याची नुकसान भरपाई करावी लागणार आहे.
खरंतर,राष्ट्रीय ग्राहक विवाद निवारण आयोगाच्या निर्णयाला योग्य असल्याचे ठरवत हा मुद्दा जाहीर केला आहे. तर दिल्लीती ताज हॉटेल मधून 1998 मध्ये एखा व्यक्तीची मारुती झेन कार पार्किंग मधून चोरी झाली होती. त्यानंतर आयोगाने या प्रकरमी हॉटेलच्या मॅनेजमेंटला जबाबदार ठरवले. आयोगाने असे म्हटले की, हॉटेलच्या पार्किंगमधून ज्या व्यक्तीची गाडी होती त्याला ती पुन्हा मिळाली पाहिजे. तसेच दिल्लीच्या ताजमहल हॉटेलकडून या प्रकरणी आयोगाकडून 2.8 लाख रुपयांचा दंड स्विकारला होता.(बंगळुरु येथे सुरु असलेल्या Aero India Show 2019 मधील पार्किंग लॉटमध्ये आग; 300 वाहने जळून खाक Video)
सुप्रीम कोर्टाने असे म्हटले आहे की, हॉटेल असे बोलले जाऊ शकत नाही की पार्किंग ग्राहकाला फुकटात उपलब्ध आहे. तसेच ग्राहकाकडून रुम, फूड, एन्ट्री फी यांच्यासाठी सुद्धा पैसे घेतले जातात. दरम्यान कोर्टाने अद्याप हे स्पष्ट केले आहे की हॉटेल जेव्हा अशा प्रकरणी नुकसान भरापाई देऊ करेल त्यावेळी त्यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावा असावा. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे आता ग्राहकांना दिलासा मिळणार आहे.