बंगळुरु येथे सुरु असलेल्या 'एरो इंडिया' एअर शो मध्ये आग लागण्याच्या धक्कादायक घटनेत तब्बल 300 वाहने जळून खाक झाली आहेत. ही आग बंगळुरुच्या (Bengaluru) येलाहंका एअर फोर्स स्टेशनच्या (Yelahanka Air Force Station) पार्किंग लॉटमध्ये लागली आहे. या एअर फोर्स स्टेशनमध्ये एरोइंडिया 2019 हा शो सुरु आहे. Aero India 2019: बंगळुरु येथील Air Show मध्ये बँडमिंटनपटू 'पी.व्ही. सिंधू'चे तेजस विमानातून उड्डाण (Photos)
आज (23/2/2019) दुपारी पार्किंग भागात जळती सिगरेट टाकल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. आग लागलेल्या गाड्या पार्किंग लॉटच्या गेट नं. 5 जवळ होत्या.
सोशल मीडियावरील हा व्हिडिओ आगीची तीव्रता दाखवून देतो.
#Bengaluru fire near parking lot at #AeroIndia2019 , many vehicles parked there caught fire says officials, fire personal at work @NewIndianXpress pic.twitter.com/v85a4RWp5L
— Ashwini M Sripad (@AshwiniMS_TNIE) February 23, 2019
हा धक्कादायक घटनेनंतर 'एरोइंडिया 2019' शो तात्पुरता स्थगित करण्यात आला आहे. अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
आगीची भडका अधिक भडकल्याचे दिसून येते कारण जळून खाक झालेल्या गाड्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. या प्रकरणी न्यायालयाने तपासणीचे आदेश दिले आहेत.