PV Sindhu at Aero India 2019 (Photo Credits: ANI)

बंगळुरु येथे सुरु असलेल्या 'एरो इंडिया' एअर शो मध्ये भारताची बँडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू (P. V. sindhu) हीने सहभाग घेतला. यावेळी सिंधूने तेजस विमानातून उड्डाण केले. तेजस विमान हे भारतीय हवाई दलात नुकतेच दाखल झाले आहे. हवाई दलातील महिला सैनिकांच्या उत्तम कामगिरीचा गौरव म्हणून तेजस विमानातून सिंधूने भरारी घेतली.

8 मार्च रोजी महिला दिनानिमित्त होणाऱ्या एअर शोच्या सरावासाठी सिंधूने तेजस विमानातून उड्डाण घेतले असून या शो मध्ये सिंधू तेजस विमानाची को-पायलट (co-pilot) म्हणून भूमिका बजावणार आहे.

तेजस विमानाची निर्मिती ही हिंदुस्थान एरोनॉटीक्स लिमीटेड (Hindustan Aeronautics Ltd) कंपनीद्वारे करण्यात आली असून या विमानामुळे हवाई दलाची क्षमता वाढण्यास मदत होईल.  तेजस विमान हे सिंगल इंजिन मल्टीरोल लाईट फायटर (single-engine multirole light fighter) विमान आहे.