Stock Market | Representational Image (Photo Credits: Pixabay)

भारतीय शेअर बाजार (Indian Stock Market) आज (20 जानेवारी) शनिवार असूनही सुरु राहणार आहे. बाजाराचे अभ्यास सांगत आहेत की, देशातील एकूण वातावरण पाहता बाजार आज शक्यतो गुंतवणूकदारांन नाराज करणार नाही. मुंबई स्टॉक एक्सेंज (BSE) आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज (NSE) यांचे अनुक्रमे सेन्सेंक्स (Sensex), निफ्टी (Nifty) आज हिरवे राहू शकतात. शेअर बाजार पाठिमागील तीन दिवसांपासून सातत्याने लाल झेंडा फडकवत नकारात्मक दिशेने निघाले आहे. मात्र, आज हा ट्रेण्ड बदलू शको. त्यामुळे खरेदीदारांना चांगली संधी मिळू शकते, असा व्होरा आहे. अर्थात हा बाजार असल्याने येथे काहीही निश्चितता नसते. खरे तर अनिश्चितता हाच शेअर बाजाराचा गुणधर्म आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आपापल्या जबाबदारीवरच जोखीम उचलावी हेच खरे.

शुक्रवारी (19 जानेवारी) बाजार बंद झाल्यानंतर आज शनिवार (20 जानेवारी) बाजार दुसर्‍या ट्रेडिंग दिवसासाठी सज्ज होत असताना, गुंतवणूकदार आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड या प्रमुख कंपन्यांच्या तिमाही कमाईच्या अहवालांवर बारकाईने लक्ष ठेवतील. याशिवाय, जागतिक संकेतांमुळे बाजाराला सकारात्मक प्रेरणा मिळणे अपेक्षित आहे आहे. (हेही वाचा, SEBI Bans Naked Short Selling: नेकेड शॉर्ट सेलिंग नियमात बदल, संस्थात्मक गुंतवणूकदाराला डे ट्रेडिंग करण्यास परवानगी नाही- सेबी)

मुख्य कंपन्यांचे तिमाही अहवाल:

आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, युनियन बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि इतर यांसारख्या कंपन्या 20 जानेवारी रोजी त्यांचे तिमाही अहवाल जाहीर करणार आहेत. हे अहवाल सदर कंपन्यांच्या संबंधित स्टॉक्सच्या कामगिरीवर परिणाम करतील आणि एकूणच बाजारातील भावनांनाही हातभार लावतील. (हेही वाचा, Stock Market आणि Mutual Funds मध्ये पैसै गुंतवणाऱ्यासाठी महत्त्वाची बातमी! 31 डिसेंबरपर्यंत 'हे' काम न केल्यास तुमचे खाते गोठवण्यात येणार)

बाजाराचा साधारण कल

काल (19 जानेवारी) बाजार बंद झाला तेव्हा पाठिमागील तीन दिवसांच्या पडझडीतून उभा राहात सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी पुन्हा उसळी घेतली. सेन्सेक्स 496.37 अंकांनी 71,683.23 वर बंद झाला, तर निफ्टी 160.10 अंकांनी वाढून 21,622.40 वर बंद झाला. पिव्होट पॉइंट कॅल्क्युलेटर सूचित करतो की निफ्टीला 21,586, त्यानंतर 21,564 आणि 21,527 या पातळीवर त्वरित समर्थन मिळू शकते. वरच्या बाजूस, संभाव्य प्रतिकार पातळी 21,631, 21,682 आणि 21,718 वर प्रक्षेपित आहेत.

जागतिक बाजारपेठेतील ट्रेंड:

जागतिक बाजारपेठांमध्ये, विशेषतः युनायटेड स्टेट्समध्ये, S&P 500 दोन वर्षांतील सर्वोच्च पातळीवर बंद झाल्यामुळे विक्रमी उच्चांक नोंदवला गेला. टेक समभागांनी या वाढीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली, बुल मार्केटला पुष्टी दिली. तथापि, मध्यवर्ती बँकेच्या व्याजदर कपातीची अपेक्षा कमी झाल्यामुळे युरोपीय समभागांनी साप्ताहिक घसरण अनुभवली.