SIP Mutual Funds: म्यूच्युअल फंड गुंतवणुकीत मोठी वाढ; पाच वर्षात मालमत्ता मूल्य 30% वाढून 4.64 लाख कोटी रुपयांवर
SIP Mutual Funds | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

पाठिमागील काही वर्षांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा गुंतवणुकीचा दृष्टीकोण मोठ्या प्रमाणावर बदलला आहे. अनेक नागरिक म्यूच्युअल फंडामध्ये गुंतवणूक (Mutual Funds Investments) करण्यास पुढे येताना दिसत आहे. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका आकडेवरीवरुन पुढे आले आहे की, सातत्याने गुंतवणूक कायम राहिल्याने मे 2021 अखेर म्युच्युअल फंडातील एसेट बेस (मालमत्ता मूल्य) वाढून 4.67 लाख कोटी रुपयांच्याही पुढे गेले आहे. पाठमागील पाच वर्षांमध्ये म्युच्यूअल फंडांमध्ये गुंतवणूक झाल्याचा हा सर्वात मोठा आकडा आहे. पाठिमागील पाच वर्षात SIP (Systematic Investment Plan) एयूएम प्रत्येक वर्षी 30% पर्यंत वाढताना दिसत आहे.

पाठिमागील पाच वर्षांचा SIP च्या एयूएम (Asset under Management) मध्ये 30% वाढ झाली आहे. हे सर्व म्यूच्युअल फंड इंडस्ट्रीच्या एयूएमच्या दुप्पटीने वाढले आहेत. असोशिएशन ऑफ म्यूच्युअल फंड्स इन इंडिया म्हणजे AMFI द्वारा बुधवारी (16 जून) ही आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली. या आकडेवारीनुसार ऑगस्ट 2016 मध्ये SIP एयूएम 1,25,394 कोटी रुपये होता. जो पुढे मे 2021 मध्ये 4,67,366 कोटी रुपये इतका झाला. म्हणजेच यात जवळपास चौपट वाढ झाली आहे. आकड्यांनुसार गेल्या पाच वर्षांमध्ये प्रतिवर्ष SIP मध्ये योगदान दुप्पटीने वाढले आहे. 2016-17 मध्ये म्यूच्युअल फंडात वार्षीक योगाद 43,921 कोटी रुपये होते. जे 2020-21 मध्ये वाढून 96,080 कोटी रुपये झाले. (हेही वाचा, Shiv Sena-NCP Alliance: शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस संभाव्य युतीबाबत शरद पवार यांचे मोठे वक्तव्य)

आर्थिक स्थिती नाजूक असूनही डायरेक्ट टॅक्स कलेक्शन दुपटीने म्हणजेच 1.85 लाख रुपयांच्या पुढे गेले आहे. मासिक SIP कॉट्रीब्यूशनमध्येही वार्षीक आधारावर दीडपटीने वाढ झाली आहे. 2016-17 मध्ये एसएयपी (सिस्टिमॅटीक इन्वेस्टमेंट प्लान) मध्ये मासीक कॉन्ट्रीब्युशन मध्ये 3,497 कोटी रुपयांची गुंतवणूक होती. मे 2021 मध्ये त्यात वाढ होऊन 8,819 कोटी रुपये इतकी झाली आहे. विद्यमान आर्थिक वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यांमध्ये ही SIP 42,148 कोटी रुपये इतकी झाली आहे. पाठिमागील पाच वर्षांमध्ये म्यूच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये रिटेल गुंतवणुकदारांचा कल कोणत्या बाजूने आहे हे या आकडेवारीवरुन स्पष्ट होते. पाठिमागील पाच वर्षांमध्ये SIP अकाऊंट चार पटींनी वाढले आहे. एप्रिल 2016 मध्ये SIP अकाऊंट एक कोटी होते आता त्यात मोठी वाढ होऊन तो आकडा 3.88 कोटी रुपयांपयांवर पोहोचला. हा आकडा आणखी वाढणार असल्याचा आशावाद व्यक्त होतो आहे.