
भारतातील तमाम एलजीबीटीक्यू (LGBTQ) समूहाला आनंद वाटावी अशी बातमी आहे. देशातील पहिली टान्सजेंडर प्रकाशन आणि चित्रपट कंपनी (First Transgender Publication) सुरु करण्यात आली आहे. ही कंपनी तामिळनाडू (Tamil Nadu) येथील मदुराई (Madurai) जिल्ह्यात उघडण्यात आली आहे. विशेष म्हणजे याच कंपनीने ट्रान्सजेंडर ग्रंथालय (Transgender Library) सुद्धा उघडले आहे. ट्रान्सजेंडर रिसोर्स सेंटरच्या संचालक प्रिया बाबू यांच्या हस्ते 1 नोव्हेंबर 2020 रोजी कंपनीचे उद्घाटन करण्यात आले.
ट्रान्सजेंडर लायब्ररीमध्ये जवळपास 200 पुस्तके 10,000 वृत्त संग्रह, ट्रान्सजेंडर समूह आणि एलजीबीटीक्यू यांच्याबाबत सरकार अथवा न्यायालयाकडून आलेला प्रत्येक आदेश, निर्णय. विविध प्रकरणात सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांनी दिलेले निकाल या लायब्ररीत पाहायला मिळतात, अशी माहिती प्रिया बाबू यांनी दिली आहे. (हेही वाचा, Transgender Reservation: ट्रान्सजेंडर समूहाला सरकारी नोकरीत आरक्षण, कर्नाटक सरकारचे ऐतिहासिक पाऊल)
प्रिया बाबू पुढे सांगातत की, आमच्या ग्रंथालयात अल्पावधीतच 200 पेक्षा अधिक इंग्रजी आणि तामिळ पुस्तके उपलब्ध झाली आहेत. याशिवाय ग्रंथालयाचे आणखी एक वैशिष्ट्य असे की, आमच्याकडे 1990 पासून पुढील दशकातील सुमारे 10,000 पेक्षा अधिक वृत्तपत्रांचाही संग्रह पाहायला मिळतो. ज्यात निवाडे, सरकारी आदेश आणि निर्णय, ट्रान्सजेंडरच्या नलावरियमच्या मीटिंगचे मिनिटे आणि समुदायाबद्दल बरेच काही पाहायला, वाचायला मिळते.

प्रिया बाबू या स्वतः ट्रान्सजेंडर असून त्या मूळच्या मदुराई जिल्ह्यातील आहेत. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी सांगितले की, पाठिमागील अनेक वर्षांपासून त्या स्वत: ग्रंथपाल होत्या. केवळ ट्रान्सजेंडर समुदायासाठी स्वतंत्र ग्रंथालय निर्माण करण्याची त्यांची पाठिमागील अनेक वर्षांपासूनची कल्पना होती. जी आता प्रत्यक्षात आली आली आहे. ट्रान्सजेंडर समुदायाची सामाजिक जबाबदारी स्वीकारून, प्रिया बाबू लिंगबदल अर्थातच ट्रान्सजेंडर समुहाशी संबंधीत विविध पुस्तके, ग्रंथ आणि लिखीत, स्वरुपात उपलब्ध असलेली प्रत्येक गोष्ट मिळविण्याच्या कामात सध्या व्यग्र आहेत. त्या स्वत: एक लेखिका असल्याने, त्यांनी तिच्या प्रकाशनांमध्ये ट्रान्स समुदायाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे.या ग्रंथालयाच्या छत्रछायेत प्रवेश करणाऱ्या संशोधकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, असल्याचेही त्या सांगतात.
लायब्ररीमध्ये 180 हून अधिक विद्यार्थी, पीएचडी स्कॉलर, संशोधक आणि चित्रपट उद्योजकांसाठी ही लायब्ररी एक फलदायी संस्था बनली आहे. केरळ आणि मुंबईतील विद्यार्थी देखील त्यांच्या 1 महिन्याच्या इंटर्नशिप आणि शिकण्याच्या हेतूंसाठी या लायब्ररीचा वापर करतात, असे त्या सांगतात. प्रिया बाबूने ट्रान्स समुदायातील लेखकांना मोफत पुस्तके प्रकाशित करण्याची परवानगी देऊन "ट्रान्स पब्लिकेशन्स" देखील सुरू केले आहे. त्यामुळे ट्रान्स-आधारित समुदाय विषयावरील पुस्तके देखील विनामूल्य प्रकाशित केली जातात.