Covaxin घेतलेल्या नागरिकांवर आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी निर्बंध? जाणून घ्या कारण
Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

कोविड-19 लस (Covid-19 Vaccine) घेतलेल्या नागरिकांना अनेक देशांनी आंतरराष्ट्रीय प्रवासाची मुभा दिली आहे. यासाठी विविध देशांनी आपल्या पॉलिसीज देखील जाहीर केल्या आहेत. मात्र भारत बायोटेकची (Bharat Biotech) कोवॅक्सिन (Covaxin) घेतलेल्या नागरिकांना आंतरराष्ट्रीय प्रवास करता येणार नाही. सुरुवातीचे काही महिने तरी हे बंधन कायम असेल. टाईम्स ऑफ इंडिया ने या संबंधीचे वृत्त दिले आहे. (COVID-19 Vaccination in India: भारतातील लसीकरणाला येणार वेग; COVAXIN च्या 20 कोटी अधिक लसींचे उत्पादन)

बहुतांश देश त्यांच्या देशात तयार करण्यात आलेली लस किंवा WHO ने आपात्कालीन वापरासाठी मान्यता दिलेल्या यादीत समाविष्ट केलेल्या लसी ग्राह्य मानत आहेत. या यादीत सीरम इंस्टीट्यूटने बनवलेली कोविशिल्ड, मॉर्डना, फायझर, अस्ट्राझेन्का, नेदरलँडमधील जेन्सेन, सिनोफार्म/ बीबीआयपी या लसींचा समावेश केला असून कोवॅक्सिनचा अद्याप या यादीत समावेश करण्यात आलेला नाही. (Covid-19 Vaccine Update: भारतातील Biological E. करणार J & J कोविड-19 लसीची निर्मिती)

WHO च्या मार्गदर्शन पत्रकानुसार, भारत बायोटेकने आपला अर्ज दाखल केला असून त्यांच्याकडून अधिक माहितीसाठी जागतिक आरोग्य संघटना वाट पाहत आहे. WHO सोबतची प्री-सब्मिशन मिटिंग मे-जून मध्ये होण्याची शक्यता आहे. या मिटिंगनंतर कोवॅक्सिनचा WHO च्या यादीत समावेश करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. विशेष म्हणजे या संपूर्ण प्रक्रीयेतील एकेका टप्प्यासाठी आठवड्याभराचा कालावधी लागू शकतो. (Bharat Biotech च्या Covaxin ला 2-18 वयोगटातील मुलांवर चाचणी करण्यास DCGI ची परवानगी)

एखाद्या लसीस ठराविक देशाने मान्यता दिली नसल्यास ती लस घेतलेल्या व्यक्तीस संबंधित देशात प्रवास करता येणार नाही. अशी माहिती Immigration Expert Vikram Shroff यांनी दिली आहे.

दरम्यान, सध्या देशात भारत बायोटेकची कोवॅक्सिन, सीरमची कोविशिल्ड लसी दिल्या जात असून अलिकडेच रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीला आपात्कालीन वापरासाठी परवानगी मिळाली आहे. तसंच स्पुटनिक लाइट या सिंगल डोस लसीला देखील लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.