भारत बायोटेक (Bharat Biotech) आपली लस उत्पादन क्षमता वाढवणार आहे. तब्बल 20 कोटी अधिक कोव्हॅक्सिन (COVAXIN) चे उत्पादन करण्यात येणार आहे. या अतिरिक्त लसींचे उत्पादन भारत बायोटेकच्या गुजरात (Gujarat) मधील अंकलेश्वर (Ankleshwar) येथील Chiron Behring Vaccines येथे होणार आहे. (Bharat Biotech चा दावा; भारतात आणि ब्रिटनमध्ये सापडलेल्या Covid-19 च्या सर्व स्ट्रेनवर प्रभावी आहे Covaxin)
भारत बायोटेकने आपल्या निवदेनात म्हटले की, 20 कोटी लसींचे डोस उत्पादन करण्याचा कंपनीचा मानस आहे. हैद्राबाद स्थित भारत बायोटेकने आपल्या निवदेनात म्हटले की, वर्षाला 20 कोटी लसींचे डोस उत्पादन करण्याचा कंपनीचा मानस आहे. GMP facilities अंतर्गत ज्या केंद्रामध्ये लसीचे उत्पादन होत आहे अशा केंद्रांचा वापर करुन हे लक्ष्य गाठण्याचा कंपनीचा उद्देश आहे.
2021 च्या चौथ्या तिमाहीत अंकलेश्वर येथे लस उपलब्ध होण्यास सुरुवात होईल. भारत बायोटेकने आपल्या हैद्राबाद आणि बंगलोर कॅम्पसमध्ये अनेक प्रॉडक्शन लाईन्स तैनात केल्या असून त्यामध्ये Chiron Behring चा समावेश करण्यात आला आहे.
अतिरिक्त लसीच्या उत्पादनामुळे सुमारे 1 बिलियन लसींचे डोसेस वर्षाला उपलब्ध होतील. कंपनीने स्वत:च्या कॅम्पसमध्ये स्पेशलाईड मॅनिफॅक्चरिंग सुरु केल्याने अगदी सुरक्षितरित्या या लसींचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेता येईल, असे कंपनीने सांगितले आहे.
सध्या भारत कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेशी सामना करत आहे. या लाटेत अनेकांनी आपले प्राण गमावले असून कोरोनाबाधितांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. तसंच तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचे मतही तज्ञांनी मांडले आहे. त्यामुळे कोरोनाचा धोका टाळण्यासाठी लसीकरणाची गती वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. लसींच्या अतिरिक्त उत्पादनामुळे लसीकरणाला वेग येईल, अशी आशा आहे.