Bharat Biotech चा दावा; भारतात आणि ब्रिटनमध्ये सापडलेल्या Covid-19 च्या सर्व स्ट्रेनवर प्रभावी आहे Covaxin
Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

देशात कोरोना विषाणूने (Coronavirus) हाहाकार माजवला आहे. कोरोनाचे दर काही दिवसांनी समोर येणारे व्हेरिएंट चिंतेचा विषय बनले आहेत. काही दिवसांपूर्वीच आंध्र प्रदेशमध्ये एक नवा व्हेरिएंट आढळून आला, जो आता इतर अनेक देशांत पोहोचला आहे. या पार्श्वभुमीवर कोरोनाची देशी लस उत्पादक भारत बायोटेकने (Bharat Biotech) दावा केला आहे की, त्यांची लस कोव्हॅक्सिन (Covaxin) ही विषाणूच्या ब्रिटनचा स्ट्रेन व भारतात सापडलेल्या धोकादायक व्हेरिएंटविरूद्ध प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. भारत बायोटेकने रविवारी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोव्हॅक्सिन अशा एंटीबॉडीज तयार करते जे कोरोना विषाणूच्या विद्यमान सर्व प्रकारांचा प्रतिकार करण्यास सक्षम आहेत.

जगभरात कोरोना विषाणूच्या भारतीय आणि ब्रिटनच्या स्ट्रेनची भीती आहे. बरेच तज्ञ असा दावा करतात की, नवीन लस कोरोना विषाणूच्या भारतीय आणि ब्रिटनच्या स्ट्रेनवर प्रभावी नाही. त्याचबरोबर जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) एका अहवालात असेही म्हटले आहे की, फायझर आणि इतर आधुनिक लसी कोरोना विषाणूच्या भारतीय स्ट्रेनवर फायदेशीर ठरू शकणार नाहीत.

अशा वेळी भारतात बनवलेल्या जाणाऱ्या इंडिया बायोटेकच्या कोव्हॅक्सिनकडून आशा निर्माण झाल्या आहेत. कंपनीने म्हटले आहे की त्यांची लस भारतातील कोरोनाचा अत्यंत संक्रामक स्ट्रेन B.1.167 विरूद्ध प्रभावी आहे. तसेच ब्रिटनमध्ये आढळलेला कोरोनाचा धोकादायक स्ट्रेन B.1.1.7 वरही विजय मिळवण्यात यशस्वी ठरली आहे. (हेही वाचा: 2-DG Drug: उद्या रिलीज होणार DRDO च्या अँटी कोविड-19 औषधाची पहिली बॅच; Covid-19 लढाईत मदत मिळण्याची आशा)

भारत बायोटेकच्या सह-संस्थापक आणि संयुक्त व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा एल्ला म्हणाल्या की, वैज्ञानिक संशोधन डेटाच्या आधारे कोव्हॅक्सिनला पुन्हा आंतरराष्ट्रीय मान्यता मिळाली आहे. हे ही गोष्ट सिद्ध करते की, ही लस सर्व प्रकारच्या कोरोना प्रकारांविरूद्ध प्रभावी आहे. मात्र, त्यांच्या ट्विटनंतर कोव्हॅसिनच्या उपलब्धतेबद्दल पुन्हा एकदा सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.