Bharat Biotech च्या Covaxin ला 2-18 वयोगटातील मुलांवर चाचणी करण्यास DCGI ची परवानगी
Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

भारत बायोटेकची (Bharat Biotech) कोविड-19 लस (Covid-19 Vaccine) कोव्हॅक्सिनला (Covaxin) 2-18 वयोगटातील मुलांवर चाचणी करण्यास DCGI ची परवानगी मिळाली आहे. त्यानंतर आता दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्स (Clinical Trials) करण्यात येतील. सुमारे 525 निरोगी स्वयंसेवकांवर या चाचण्या करण्यात येतील. या ट्रायल्स AIIMS, दिल्ली, पटना, मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर येथे करण्यात येतील. दरम्यान, तज्ञ समितीने या ट्रायल्सच्या मागणीचे पत्र 11 मे 2021 रोजी दिले होते. यापूर्वी 24 फेब्रुवारी रोजी हा प्रस्ताव SEC मिटींगमध्ये मांडण्यात आला होता.

तज्ञ समितीने केलेल्या शिफारसीनंतर DCGI ने सखोल परिक्षण करुन कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचणीसाठी मान्यता दिली आहे. या ट्रायल्स दरम्यान कोव्हॅक्सिन लसीचे दोन डोस स्वयंसेवकांना देण्यात येतील. लसीचा पहिला डोस घेतल्यानंतर 28 दिवसानंतर लसीच्या दुसरा डोस देण्यात येईल. (Covid-19 Vaccine Update: भारत बायोटेकची Covaxin लस 18 वर्षाखालील मुलांना मिळणार? Clinical Trials साठी तज्ञांची शिफारस)

ANI Tweet:

कोव्हॅक्सिन लसीला संपूर्ण देशभरामध्ये मोठ्या प्रमाणात मागणी आहे. 1 मे पासून देशातील 18 राज्यांना कोव्हॅक्सिन पुरवणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि आसाम अशा राज्यांचा यात समावेश आहे. भारत सरकारने दिलेल्या आदेशानुसार, ही लस राज्य सरकारी रुग्णालयांना 400 रुपये प्रति डोस या किंमतीत देण्यात येईल.