Covid-19 Vaccine Update: भारत बायोटेकची Covaxin लस 18 वर्षाखालील मुलांना मिळणार? Clinical Trials साठी तज्ञांची शिफारस
Covaxin (Photo Credits: Bharat Biotech)

भारत बायोटेकची (Bharat Biotech) कोविड-19 लस (Covid-19 Vaccine) कोवॅक्सिन (Covaxin) चे दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्स (Clinical Trials) 18 वर्षाखालील लहान मुलांसाठी सुरु करण्याची शिफारस तज्ञांच्या पॅनलने दिली आहे, अशी माहिती अधिकृत सुत्रांकडून देण्यात आली आहे. या ट्रायल्स AIIMS, दिल्ली, पटना, मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, नागपूर यांसह 525 विविध जागांवर घेण्यात येतील. (Bharat Biotech कंपनीने कमी केले Covaxin लसीचे दर, राज्यांना 600 रुपयांऐवजी 400 रुपयांना मिळणार डोस)

2 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांमध्ये कोवॅक्सिन लसीसाठी केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेच्या (सीडीएससीओ) कोविड-19 वरील विषय तज्ज्ञ समितीने (एसईसी) मंगळवारी हैदराबाद स्थित भारत बायोटेकच्या सेफ्टी, रिएक्टोजेनिसिटी आणि इम्यूनोजेनिसिटीचे चाचणी करण्यासाठी फेज II / III क्लिनिकल चाचण्या घेण्याची परवानगी मागतली आहे.

PTI Tweet:

यावरील चर्चेनंतर काही अटी-शर्थींच्या आधारे लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्लिनिकल ट्रायल्स करण्याचे निश्चित झाले आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु करण्यापूर्वी दुसऱ्या टप्प्यातील सेफ्टी टेडा रिपोर्ट सादर करणे आवश्यक आहे. यासोबत तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सुरु करण्यासाठी DSMB ची शिफारस देखील गरजेची आहे, अशी माहिती सुत्रांनी दिला आहे. यापूर्वी 24 फेब्रुवारी रोजी हा प्रस्ताव SEC मिटींगमध्ये मांडण्यात आला होता. त्यानंतर फर्मला रिव्हाईड क्लिनिकल ट्रायल प्रोटोकॉल दाखल करण्यास सांगितला होता.

कोवॅक्सिन ही लस भारत बायोटेक आणि आयसीएमआर यांनी एकत्रितपणे विकसित केली असून प्रौढांसाठी लसीकरण मोहिमेत या लसीचा वापर केला जात आहे.