सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India,) कंपनीने आपल्या कोरोनावरील लस कोविशील्ड (Covishield) लसीचे दर कमी केल्यानंतर भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीनेही आपली लस कोवैक्सीन (Covaxin) बाबत नवे दरपत्रक जारी केले. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि खासगी ग्राहकांना ही लस किती आणि कोणत्या दरात उपलब्ध होईल याबातब दरांची आकडेवारी प्रसिद्ध केली. दरम्यान, दरपत्रकावरुन होऊ लागलेल्या टीकेनंतर भारत बायोटेकने आपले दर बदलले आणि नवे दरपत्रक जाहीर केले आहे. नव्या दरपत्रकानुसार भारत बायोटेकची कोवैक्सीन ही लस राज्यांना आता प्रति डोस 400 रुपयांना मिळणार आहे. भारत बायोटेक सरुवातीला प्रति डोस 600 रुपये असा दर जाहीर केला होता. एक पत्रक प्रसिद्ध करुन कंपनीने ही माहिती दिली आहे. दरम्यान, खासगी रुग्णालयांसाठी ही लस आता 1200 रुपये प्रति डोस या दराने मिळणार आहे. सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाकडून आपल्या लसीची किंमत कमी केल्यानंतर भारत बायोटेकचा हा निर्णय आला आहे.
देशात सध्यास्थितीत सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया ची लस कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवैक्सीन या लसींना वापरासाठी मान्यता देण्यात आली आहे. भारत बायोटेकने आयसीएमआरच्या सहकार्याने Covaxin लस निर्मिती केली आहे. रशीयन कोरोना लस स्पूतनिक V च्या वापरालाही नुकतीच मान्यता देण्यात आली आहे. भारतात रशिनय लस लवकरच वापरात आणली जाण्याची शक्यता आहे. कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यात सरकार 18 वर्षांवरील सर्व नागरिकांचे येत्या 1 मे पासून लसिकरण करणार आहे. सरकारने तशी परवानगी दिली आहे. या आधी केवळ हेल्थकेयर वर्कर्स, फ्रंटलाइन वर्कर्स आणि 45 वर्षांवरीलच नागरिकांना कोरोना लस देण्यास मान्यता होती. (हेही वाचा, COVID 19 Vaccine: सीरम इंस्टीट्यूटची Covishield आणि भारत बायोटेकच्या Covaxin यांच्या दरात फरक किती? जाणून घ्या दोन्ही लसींचे दरपत्रक)
Bharat Biotech - COVAXIN® Announcement - April 29, 2021 pic.twitter.com/RgnROIfUCe
— BharatBiotech (@BharatBiotech) April 29, 2021
भारतात कोरोना व्हायरस संसर्गाची दुसरी लाट आली आहे. कोरनाच्या दुसऱ्या लाटेत कोरोना संक्रमितांची संख्या प्रचंड वाढली आहे. त्यामुळे देशातील सर्व नागरिकांचे लसीकरण करावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारे प्रयत्नशिल आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज (29 एप्रिल 2021) दिलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात देशात 3,79,257 नागरिकांना कोरोनाचे संक्रमण झाले. तर 3645 जणांचा मृत्यू झाला. 2,69,507 नागरिकांना डिस्चार्ज देण्यात आला. देशात आतापर्यंत 1,83,76,524 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 1,50,86,878 जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. देशात आजघडीला कोरोनाचे 30,84,814 सक्रिय रुग्ण आहेत. तर आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 2,04,832 इतकी आहे. दरम्यान, देशात आतापर्यंत 30,84,814 नागरिकांचे कोरोना लसीकरण झाले आहे.