भारतात सध्या कोरोना व्हायरस (Coronavirus) नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणावर लसीकरण सुरु आहे. नजीकच्या काळात लसीकरण उपक्रमाचा विस्तार आणखी मोठ्या प्रमाणावर केला जाणार आहे. दरम्यान, सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया (SII) ने आपल्या कोविशिल्ड (Covishield) लसीचे दर जाहीर केले आहेत. हे दर 1 मेपासून लागू असतील. दुसऱ्या बाजूला भारत बायोटेक कंपनीनेही त्यांच्या कोवॅक्सिन लसीची किंमत जाहीर केली आहे. खासगी रुग्णालयांसाठी ही लस Adar Poonawalla कोविशिल्ड लसीपेक्षाही काहीशी महाग प्रमाणात खरेदी करावी लागणार आहे. भारत बायोटेक (Bharat Biotech) ने शनिवारी (24 एप्रिल) रात्री उशीरा ट्विटर पोस्टच्या माध्यमातून कोवॅक्सिन (Covaxin) बाबतच्या दरांची माहिती दिली. पाहा कोविशिल्ड आणि कोवॅक्सीन या दोन्ही लशींचे दरपत्रक आणि दोन्हींमध्ये किती आहे फरक.
भारत बायोटेक कोवॅक्सिन दरपत्रक
भारत बायोटेक त्यांचे कोवॅक्सीन केंद्र सरकारला अवघ्या 150 रुपये प्रतिडोस या दराने देणार आहे. तर, राज्य सरकारांना हीच लस 600 रुपये प्रतिडोस दराने घ्यावी लागणार आहे. खासगी रुग्णालयांना ही लस घेण्यासाठी 1200 रुपये मोजावे लागणार आहेत. कोवॅक्सीन जर विदेशात निर्यात करायची असेल तर त्यासाठी 15 ते 20 डॉलर इतके मूल्य निर्धारित करण्यात आले आहे. (हेही वाचा, Coronavirus: केंद्र सरकार खरेदी केलेली Corona Vaccines राज्यांना मोफत देणार, लस आणि ऑक्सिजन उपकरणांवरील सीमा शुल्कही माफ)
Bharat Biotech - COVAXIN® Announcement pic.twitter.com/cKvmFPfKlr
— BharatBiotech (@BharatBiotech) April 24, 2021
सिरम इन्स्टिट्युट कोविशिल्ड दरपत्रक
सिरम इन्स्टिट्युटने जाहीर केलेल्या दर पत्रकानुसार कोविशिल्ड लसीचे दर खालील प्रमाणे
केंद्र सरकार- 150 रुपये प्रतिडोस
राज्य सरकार- 400 रुपये प्रतिडोस
खासी रुगणालय- 600 रुपये प्रतिडोस
IMPORTANT ANNOUNCEMENT pic.twitter.com/bTsMs8AKth
— SerumInstituteIndia (@SerumInstIndia) April 21, 2021
युरोपीय देशांमध्ये कोविशिल्डचे दर (आकड्यांमध्ये बदल शक्य)
ब्राझील- 3.15 डॉलर
ब्रिटन- 3 डॉलर
अमेरिका- 4डॉलर
दरम्यान, सीरमने कोविशिल्ड लस भारताबाहेरही निर्यात केली आहे. त्यानुसार कोविशिल्डचे भारतातील दर जगभरातील देशांपेक्षा अधिक असल्याचा दावा करण्यात येत होता. सीरमने अमेरिका, ब्रिटन, युरोपातील काही देश, बांगलादेश, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका आदी देशांना लसपुरवठा केला आहे.ज्या देशांनी कोविशिल्ड लस खरेदी केली आहे. त्यापैकी बहुतांश देश आपल्या नागरिकांना मोफत लसीकरण करत आहेत.