Covid-19 Vaccine Update: भारतातील Biological E. करणार J & J कोविड-19 लसीची निर्मिती
Coronavirus Vaccine | Representational Image | (Photo credits: Flickr)

भारतात सध्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा (Coronavirus Second Wave) विळखा तीव्र झाला आहे. यातच लसींच्या अपुऱ्या साठ्यामुळे लसीकरणचा वेग मंदावला आहे. यातच कोव्हॅसिन, कोविशिल्ड आणि स्पुटनिक व्ही सह अजून एका लसीची निर्मिती भारतात होणार आहे. देशातील Biological E. या संस्थेकडून जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson) या कंपनीची कोविड-19 लसीची (Covid-19 Vaccine) निर्मिती केली जाणार आहे. यासोबतच कंपनी त्यांच्या कोरोना लसीची निर्मिती देखील करणार आहे. यामुळे लसींच्या तुडवण्याचा प्रश्न मार्गी लागण्याची शक्यता आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही लसींच्या निर्मितीसाठी वेगळे प्लॉंट आणि पायाभूत सुविधा असणार आहेत. तसंच प्रत्येक लसीची स्वतंत्र पातळीवर निर्मिती करण्यात येणार आहे. वर्षाला 600 मिलियन डोसेसची निर्मिती करण्याचे कंपनीचे लक्ष्य आहे. मागील महिन्यांत या लसीच्या स्थानिक क्लिनिकल ट्रायल्ससाठी परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर आता निर्मितीहीचा निर्णय घेण्यात आला आहे.

Biological E. ही संस्था हैद्राबाद येथे आहे. या संस्थेकडून ऑगस्ट महिन्यापासून दर वर्षी 75 ते 80 मिलियन लसींची निर्मिती करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, ही लस ह्युस्टनमधील Baylor College of Medicine आणि Dynavax Technologies Corp यांनी एकत्रितपणे विकसित केली आहे. (अदर पूनावाला म्हणतात 'देशातील जनतेकडे सीरम इंस्टीट्यूटचे दुर्लक्ष नाही, भारतासारख्या देशात 2-3 महिन्यांत कोरोना लसीकरण अशक्य')

दरम्यान, देशात लसींचा तुडवटा भासत आहे. त्यामुळे जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लसीचे निर्मितीमुळे लस तुटवडा कमी होण्यास नक्कीच मदत होईल. सध्या देशात कोव्हॅसिन, कोविशिल्ड या दोन लसी दिल्या जात आहेत. काही दिवसांपूर्वीच रशियाच्या स्पुटनिक व्ही लसीचीची पहिली खेप भारतात दाखल झाली. हैद्राबादमध्ये त्या लसीचा पहिला डोसही देण्यात आला. त्यानंतर आता जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीच्या लसीची भर पडली आहे.