Adar Poonawalla | (Photo Credits-Facebook)

लस उत्पादक कंपनी सीरम इस्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute Of India) ने कोरोना लसीकरण (Corona Vaccination) निर्यातीबाबत महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. कंपनीचे सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी म्हटले आहे की, आम्ही कोरोना लसींची निर्यात केली असली तरी, भारतीय जनतेकडे दुर्लक्ष केले नाही. भारतातील कोरोना लसीकरणाबाबत जेही करावे लागेल त्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत. सीरम इन्स्टीट्यूटकडून मंगळवारी (18 मे 2018) एक निवेदन प्रसिद्ध करण्यात आले. या निवेदनात एसआयआय (SII) ने म्हटले आहे की, कंपनीकडे जानेवारी 2021 मध्ये लसींचा उत्पादित केलेला मोठा साठा होता. लसीकरण अभियान सुरु झाले होते आणि दाखल होत असलेल्या कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये मर्यादित वाढ होत होती. त्या वेळी देशासह जगभरातील अनेक अभ्यास, वैज्ञानिक आणि मान्यवरांचे म्हणने होते की, भारतात कोरोना व्हायरस (Coronavirus) महामारी कमी प्रमाणात दिसत आहे. त्यामुळे भारताने लसीची निर्यात करावी.

भारतात उत्पादन होत असलेल्या कोरोना लसीच्या निर्यातीवरुन निर्माण झालेल्या गदारोळाबाबत बोलताना सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया चे सीईओ आदर पूनावाला यांनी केंद्र सरकारचा बचाव केला आहे. पूनावाला यांनी म्हटले आहे की, भारतातील लोकसंख्येचा विचार करता इतक्या मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या असलेल्या देशात केवळ 2-3 महिन्यांमध्ये कोरोना लसीकरण पूर्ण होऊ शकत नाही. पूनावाला यांनी मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदानात हे मत व्यक्त केले आहे. त्यांनी भारतात कोरोना लसीकरणास 2-3 वर्षेही लागतील तसेच, सर्वांना कोरोना लस उपलब्ध झाल्यानंतरच कोरोना महामारी दूर होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, अदर पूनावाला यांनी महाराष्ट्राला लस देण्यात काहीसं झुकतं माप द्यावं- आरोग्यमंत्री राजेश टोपे)

सीरम इन्स्टीट्यूटने म्हटले की, कंपनीने भारतात कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर नव्हती आणि जगभरातील देशांना जेव्हा आवश्यकता होती अशा काळात सीरमने कोरोना लसीची निर्यात केली. आपल्याला एक बाब लक्षात घ्यावी लागेल की, कोरोना महामारीला कोणतीही राजकीय किंवा भौगोलीक सीमा नाही. त्यामुळे केवळ भारतच नव्हे तर जगभरातील प्रत्येक व्यक्तीचे लसीकरण होत नाही तोपर्यंत आपण सूरक्षीत नाही.