भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने सोमवारी (29 मे) दुसऱ्या नेव्हिगेशन उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. ज्यामध्ये क्रायोजेनिक अप्पर स्टेज असलेल्या GSLV रॉकेट वापरण्यात आले. NVS-01 अचूक आणि रीअल-टाइम नेव्हिगेशन प्रदान करून देशाच्या प्रादेशिक नेव्हिगेशन प्रणालीमध्ये वाढ करेल, असा विश्वास इस्त्रोकडून या वेळी व्यक्त करण्यात आला. श्रीहरी कोटा येथून या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. साधारण 27.5-तासांच्या काउंटडाउनच्या शेवटी, चेन्नईपासून सुमारे 130 किमी अंतरावर असलेल्या या स्पेस पोर्टवरील दुसऱ्या लॉन्च पॅडवरून 51.7-मीटर-उंच, 3-स्टेज जिओसिंक्रोनस सॅटेलाइट लॉन्च व्हेईकल सकाळी 10.42 वाजता नियोजीत वेळेनुसार हा उपग्रह प्रक्षेपीत झाला. . जीएसएलव्हीचे हे 15 वे उड्डाण होते.

वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, NavIC कडील सिग्नल 20 मीटरपेक्षा अधिक अचूक आणि वेळेची अचूकता 50 नॅनोसेकंदांपेक्षा अधिक अचूक दाखवेल अशा बेताने या उपग्रहाची रचना करण्यात आली आहे.

ट्विट

ISRO चे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी मोहिमेच्या उत्कृष्ट यशस्वीतेबद्दल संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. NVS-01 GSLV ने अचूक कक्षेत पाऊल ठेवले आहे. मिशन कंट्रोल सेंटरमधून केलेल्या छोटेखणी भाषणात ते म्हणाले, मिशन पूर्ण केल्याबद्दल इस्रोच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन.