एकाच वेळी इतर ठिकाणी म्हणजेच दुहेरी नोकरी (Double Job) करणाऱ्या कर्मचाऱ्यांना विप्रोने नोकरीवरुन काढून टाकले. साईड जॉब घेतल्याुळे विप्रोने 300 कर्मचाऱ्यांना काढून टाकले. त्यानंतर मूनलाइटिंग (Moonlighting Job) हा शब्द चर्चेत आला आहे. आरोग्य तज्ज्ञांनीही मूनलाईटींगबद्दल धोक्याचा इशारा दिला आहे. आरोग्य तज्ज्ञांचे म्हणने असे की, 11-12 तास काम करणे तुमच्या शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जे लोक 11 तास किंवा त्याहून अधिक वेळ काम करतात त्यांना नैराश्य येण्याची शक्यता सामान्य तास काम करणाऱ्यांपेक्षा 2.5 पट जास्त असते.
नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, कामाचे तास मानसिक ताण आणि कामाच्या तणावात योगदान देाणाऱ्या कर्मचाऱ्यांना भविष्यात मोठ्या त्रासांना सामोरे जावे लागते. जे कर्मचारी दररोज 10 किंवा त्याहून अधिक तास काम करतात. दर महिन्याला 40 किंवा त्याहून अधिक तास काम करतात आणि दर आठवड्याला 60 किंवा अधिक तास काम करतात. त्या कर्मचाऱ्यांना मानसिक तणावपूर्ण भावनांचा सामना करावा लागतो. अभ्यासात कामाचे दीर्घ तास आणि नैराश्य यांच्यातील संबंध देखील आढळून आला. कामाचे अधिक तास काम करताना महिला कामगारांना पुरुष कर्मचार्यांपेक्षा नैराश्य आणि चिंता अनुभवण्यास मिळण्याचा धोका जास्त असतो. (हेही वाचा, No Moonlighting: 'डबल नोकरी' करणाऱ्या कर्मचाऱ्यांना इन्फोसिस कंपनीचा इशारा, 'नो मूनलाइटिंग')
कोविड नंतर कर्मचार्यांमध्ये मूनलाइटिंग ही एक सामान्य घटना बनली आहे. दुसरी नोकरी करण्याचा हा ट्रेंड अचानक वाढला आहे. कारण साथीच्या रोगामुळे लोकांचा पगार कमी झाला आणि रोजगार आणि उत्पन्न कमी झाले. अतिरिक्त कमाई करण्यासाठी, कर्मचारी दोन नोकऱ्या निवडतात, असेही तज्ज्ञांचे एक निरिक्षण पुढे आले आहे.
वास्तविक पहता दुहेरी नोकरी केल्याने आपल्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतात. दीर्घ कामाच्या तासांवर केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की जे लोक दिवसातून 11 तासांपेक्षा जास्त काम करतात त्यांना नैराश्य येण्याची शक्यता नियमित तास काम करणाऱ्यांपेक्षा 2.5 पट जास्त असते. त्यांना झोपेचा त्रासही होतो.
मूनलाइटिंगमुळे एखाद्या व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर नेहमीच परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्याच्या/तिच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो. अशा प्रकारची कोणतीही विशिष्ट आकडेवारी उपलब्ध नसतानाही, कर्मचार्यांना योग्य मोबदला आणि नोकरीच्या समाधानासह वागणूक दिल्यास मुलनाइटींगचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल. तो/ ती कंपनीशी तसेच त्यांच्या स्वत:च्या आरोग्यासाठी एकनिष्ठ राहील, असे मतही अभ्यासक व्यक्त करतात.