मनोहर पर्रिकर यांचे निधन: नरेंद्र मोदी, नितीन गडकरी यांच्यासह अनेक राजकीय दिग्गजांची ट्विटरच्या माध्यमातून श्रद्धांजली
मनोहर पर्रिकर आणि नरेंद्र मोदी (फोटो सौजन्य-Twitter)

गोवा (Goa) मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) यांचे रविवारी संध्याकाळी निधन झाले आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात शोककळा पसरली असून नरेंद्र मोदी, नितीन गडकरी यांच्यासह अन्य दिग्गज राजकीय नेत्यांकडून सोशल मीडियावर दु:ख व्यक्त केलं जात आहे. तर केंद्रीय मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते गडकरी यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, पर्रिकर माझे सुरुवातीपासून चांगले मित्र होते. तर गोव्याच्या विकासासाठी आयुष्याच्या शेवटापर्यंत पर्रिकर यांनी प्रयत्न केले. तसेच राहुल गांधी यांनी सुद्धा पर्रिकर यांच्या निधनाने दु:ख व्यक्त केले आहे.

तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत असे म्हटले आहे की, मनोहर पर्रिकर हे मॉर्डन गोव्याचे उत्तम उदाहरण होते. त्यांचे कार्य हे बहुमोल असून कधी न विसरण्यासारखे आहे.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करत मनोहर पर्रिकर यांच्या निधानाची माहिती दिली. वयाच्या 63 व्या वर्षी राहत्या घरी पर्रिकर यांनी अखेरचा श्वास घेतला आहे.