कोरोना व्हायरसवरील (Coronavirus) लसीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्यामुळे आता कधी लस नागरिकांना दिली जाईल याची सुद्धा मोठ्या उत्सुकतेने वाट पाहिली जात आहे. मात्र याच दरम्यान, एक विचित्र गोष्ट समोर आली असून लाल मुंग्यांची चटणी (Red Ants Chutney) ही कोविड19 वर खरंच प्रभावी आहे का असा प्रश्न उपस्थितीत केला जात आहे. यावर आता ओडिशाच्या हायकोर्टाने सीएसआयआर (CSIR) आणि आयुष (AYUSH) मंत्रालयाला यावर 3 महिन्यांत निर्णय घेण्याचे निर्देशन देण्यात आले आहेत.(Pfizer-BioNTech: फायजर-बायोटेक लस आपातकालीन वापरास मंजूरी, WHO च्या निर्णयामुळे Coronavirus Vaccine आयात, वितरणाचा मार्ग मोकळा)
बरिपाडा येथील इंजिनिअर न्यायाधार पडियाळ याने सीएसआयआर यांनी 23 जून आणि आयुष्य मंत्रालयाला 7 जुलैला एक प्रस्ताव पाठवला होता. त्यानंतर पडियाल याने कोर्टात याचिका ही दाखल केली. त्याने याचिकेत असे म्हटले की, लाल मुंग्यांच्या चटणीत अॅन्टी बॅक्टेरियल घटक असून ते संसर्गापासून बचाव करण्यास मदत करतात. तसेच प्रोटीन, कॅल्शिअम आणि झिंक सारखे ही घटक असून ते रोगप्रतिकारक शक्ती सुधारण्यास मदत करतात.
यावर कोर्टाने कोणतीच प्रतिक्रिया न देता आयुष मंत्रालय आणि सीएसआयआर यांना यावर तीन महिन्यांत निर्णय घेण्यास सांगितल्याचे आहे. याबद्दल कोर्टाने 24 डिसेंबरला निर्देश दिले आहेत.(कोरोना व्हायरसच्या नव्या स्ट्रेन वर देखील Covaxin प्रभावी ठरु शकते: Bharat Biotech)
खरंतर, ओडिसा आणि छत्तीसगढ सारख्या राज्यात आदिवासी लोक हे लाल मुंग्यांची चटणी ही औषध म्हणून वापर करतात. ती लाल मुंग्या, हिरव्या मिर्च्या वापरुन ही चटणी बनवतात. या चटणीचा वापर ताप, खोकला, श्वास घेण्यास समस्या, थकव्यासह अन्य समस्यांवर उपाय म्हणून वापरली जाते.