Garlic (Photo Credits-Facebook)

अन्नाची चव वाढवण्यासाठी असो किंवा शरीराचे अनेक आजार दूर करण्यासाठी, लसूण (Garlic) अनेक गोष्टीसाठी सर्वोत्तम मानला जातो. मात्र, लसूण ही भाजी आहे की मासालाच्या पदार्थ याबाबत अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. आता नुकतेच मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने या वादाला पूर्णविराम देत उत्तर दिले आहे. हा वाद आजचा नसून 2015 सालचा आहे. याआधी 2015 मध्ये काही शेतकरी संघटनांच्या विनंतीवरून लसणाचा भाजीपाला वर्गात समावेश करण्यात आला होता. मात्र नंतर कृषी विभागाने हा आदेश रद्द करून, लसणाला पुन्हा मसाल्याचा दर्जा दिला.

कृषी विभागाने असा युक्तिवाद केला की, कृषी उत्पन्न बाजार समिती कायदा, 1972 मध्ये लसणाचे मसाला म्हणून वर्णन केले आहे. परंतु शेतकरी संघटनांना हे आवडले नाही आणि त्यांनी हे प्रकरणाबाबत 2017 मध्ये पुन्हा फेरविचार याचिका न्यायालयात दाखल केली. आता 9 वर्षांनंतर मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने यावर निकाल दिला आहे.

या निर्णयात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या इंदूर खंडपीठाने 2015 चा निर्णय कायम ठेवला आणि लसूण ही भाजी म्हणून घोषित केली. म्हणजेच आता लसूण पुन्हा भाज्यांच्या यादीत आला आहे. न्यायमूर्ती एसए धर्माधिकारी आणि डी वेंकटरामन यांच्या खंडपीठाने 2017 च्या आदेशावर शिक्कामोर्तब केले, ज्यामध्ये लसूण नाशवंत आहे आणि म्हणून ती भाजी आहे, असे मानले गेले. आता हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे की, कृषी विभाग हे प्रकरण सुप्रीम कोर्टात नेते की नाही.

शेतकरी आणि व्यापाऱ्यांच्या हितासाठी बाजारपेठेची स्थापना केली जाते, जेणेकरून त्यांना त्यांच्या मालाला चांगला भाव मिळू शकेल. त्यामुळे जे काही उप-नियम बनवले किंवा दुरुस्त केले जातात, त्याबाबत शेतकऱ्यांच्या हिताचा विचार केला जावा, असे आदेशात म्हटले आहे. न्यायालयाचाच्या या निर्णयामुळे व्यापारावरील निर्बंध दूर होतील आणि शेतकरी आणि विक्रेते दोघांनाही फायदा होईल. न्यायालयाच्या या निर्णयाचा फटका मध्य प्रदेशातील हजारो कमिशन एजंटांनाही बसणार आहे. (हेही वाचा: Veggie Valley: भारतामधील 'या' शहराला मिळाला व्हेजी व्हॅलीचा किताब; Swiggy वरून मागवले सर्वाधिक शाकाहारी पदार्थ- Reports)

दरम्यान, एनआईएचच्या अहवालानुसार, लसूण मध्य आशियामधून म्हणजेच आजच्या इराण, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानच्या आसपासच्या भागातून भारतात आल्याचे सांगितले जाते. काही इतिहासकारांचे म्हणणे आहे की, लसूण प्रथम पश्चिम चीनजवळ स्थित तियान शान पर्वतांमध्ये सापडला आणि नंतर तो भारत आणि संपूर्ण जगामध्ये पोहोचला.