vegetable photo credit Pixabay
Vegetables Rates: देशात मुसळधार पावसाने थैमान माजवले आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे रस्त्यावर पाणी साचले आहे. शहरासह गावातली जनजीवन विस्कळीत झाली आहे. रेल्वे रुळावर देखील पाणी साचलेले आहे. वाहतूकीच्या प्रवासावर मोठा परिणाम झालेला दिसत आहे. काही भागात पूरसृश्य स्थिती निर्माण झाली आहे. पावसाने शेकऱ्यांच्या पीकावर मोठं नुकसान झालं आहे. त्यामुळे भाजीपाल्यावर किंमती वाढल्या आहेत. देशभरात टोमॅटोच्या वाढत्या किंमतीमुळे नागरिक परिशान झालेले अन् आता भाजीपाला देखील महागणार असल्याचे चित्र दिसत आहे.

मुसळधार पावसामुळे शेतातील शेतमालांवर मोठे नुकसान झाले आहे. पावसाने वाहतूकीवर देखील परिणाम दिसतोय त्यामुळे बाजारात भाजीपाला कमी आल्याने तुटवडा भासून त्याचा परिणान दरांवर होत आहे.  टोमॅटो, अदरक, मिरची यांच्या किंमती आधीक वाढलेल्या आहेत. दरम्यान भेंडी, कोथिंबीर, दोडका, कोबी या भाज्यांच्या दरात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मुसळधार पावसाने शेत काही भागातील शेत देखील पुर आल्यामुळे वाहून गेले आहे. पाणी साचलेल्या शेतातून पीकं काढणं मुश्किलीचे झाल्याचे चित्र दिसत आहे.

अतिवृष्टीमुळे पीकांची नासडी झाली आहे. त्यामुळे भाजीपाल्यांचे दर वाढणार असल्याची शक्यता आहे. पावसाच्या संतत धारामुळे शेतातील मालाचं  नुकसान झाले आहे. वाहतूकीवर पावसाचा जोरदार परिणाम झाला आहे. विक्रेत्यांनाही भाज्या खरेदी करणे परवडत नाही त्यामुळे बाजारात भाज्या या महागणार आहे. भाज्याच्या वाढत्या दरामुळे सर्व सामान्य जनतेच्या खिशांवर परिणाम होणार आहे. लवकरच भाज्याचा दर नियंत्रणात येईल अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेकडून केली जात आहे.