राज्याच्या विविध भागात सध्या मुसळधार पाऊस (Heavy Rain) कोसळत आहे. या पावसामुळं अनेक भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबई पुण्यामध्ये मुसळधार पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे. मुंबईला आज पावसाचा सकाळी साडेआठ वाजेपर्यंत रेड अलर्ट देण्यात आलाय. काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तविला आहे. रायगड, रत्नागिरी आणि सातारा या तीन जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिथं अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर मुंबईसह ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. (हेही वाचा - Mumbai Pune Mumbai Cancelled Trains: बदलापूर-वांगणी सेक्शन दरम्यान पाणी वाढल्याने Deccan Queen Express, Pragati Express, Intercity Express रद्द)

पाहा पोस्ट -

पुणे शहर परिसरात काल आणि परवा रात्री झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं. मोठा फटका पुण्याला या पावसाचा बसला आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना समोर आल्या आहेत. पावसाच्या पार्श्वभू्मीवर पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग जिल्ह्याला देखील ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर रायगड, रत्नागिरी जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. रायगड, रत्नागिरी आणि सातारा या जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे.