Uttarakhand Rains: उत्तराखंड येथे रात्रभर मुसळधार पाऊस सुरु होता. या पावसाने 14 जणांचा बळी घेतला आहे तर 10 जखमी झाले आहे. रात्रभर मुसळधार पाऊस असल्याने ठिकठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे. (Heavy Rain) पावसामुळे अनेक ठिकाणी भुस्खलन झाल्याची माहिती समोर येत आहे. प्रतिकुल वातावरणामुळे केदारनाथ (Kedarnath) यात्रा स्थगित करण्यात आली आहे. (हेही वाचा- दादरी, ग्रेटर नोएडामध्ये पावसामुळे भिंत कोसळली, 2 जणांचा वेदनादायक मृत्यू - VIDEO)
उत्तराखंड सरकारने एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान कार्यकलाने परिस्थितीचा आढावा घेतला आहे. त्यामुळे केंद्राकडून भारतीय वायुसेनेसाठी दोन हेलिकॉप्टर, एक चिनूक, एक एमआय १७, राज्यातील बचाव कार्यात मदत करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. मुख्यमंत्री पुष्कर सिंग यांना पंतप्रधान यांनी आवश्यक मदतीसाठी आश्वासन दिले आहे. भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी देखील परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
बुधवारपासून राज्यात मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. गौरीकुंड आणि केदारनाथ मार्गावर भिंबळी येथील डोंगराळभागावरून दरड कोसळले. रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतुक सेवा ठप्प झाली आहे. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाली आहे. आतापर्यंत ४२५ यात्रेकरूंना लिंचोली आणि भिंबळी येथून हेलिकॉप्टरने सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले आहे. पावसामुळे १४ जणांचा मृत्यू झाला अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. डेहराडूनमध्ये ४, हरिद्वारमध्ये सहा, टीहरमध्ये ३, चमोलीत एक असा मृतांचा आकडा आहे. ठिकठिकाणी बचावकार्य सुरु आहे.