Indian Railway: भारतीय रेल्वे देशाची लाइफ लाइन असल्याचे म्हटले जाते. प्रतिदिन लाखोंच्या संख्येने ट्रेनच्या माध्यमातून नागरिक प्रवास करत असतात. काही वेळेस तिकिट बुकिंग किंवा रिजर्व्हेशनच्या वेळी रिग्रेट होते आणि NR म्हणजेच नो रुम असे सांगितले जाते. अशातच वेटिंग लिस्टचे सुद्धा तिकिट मिळत नाही. रेल्वेच्या नियमानुसार रिग्रेट झाल्यानंतर त्या ट्रेनमध्ये वेटिंग लिस्टमध्ये सुद्धा रिजर्व्हेशन मिळू शकत नाही. अखेर असे का होते? तर जाणून घ्या रेल्वेत REGRET चा नेमका कोणता अर्थ आहे.
खरंतर भारतीय रेल्वेच्या अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या जनरल, मेस आणि एक्सप्रेस ट्रेनमध्ये आरक्षणाची सुविधा दिली जाते. त्यामुळे प्रवाशांना आपली तिकिट बुकिंग केल्यानंतर सीट रिजर्व्ह करता येते. तिकिट कंन्फर्म असल्यास सोईस्कररित्या प्रवास करता येतो. दरम्यान, कोरोनाच्या परिस्थितीमुळे रेल्वेकडून आरक्षित ट्रेन चालवल्या जात असल्याने रिजर्व्हेशन करणे गरजेचे आहे.(बचत खाते आणि एफडीवरील व्याजावर सुद्धा टॅक्स लावला जातो? रिटर्न भरण्यापूर्वी हे लक्षात ठेवा)
आरक्षित ट्रेनमध्ये प्रत्येक क्लाससाठी एक निर्धारित कोटा असतो. त्याअंतर्गत तिकिट कंन्फर्म केले जाते. त्यानंतरच रिजर्व्हेशन अगेंस्ट कॅन्सिलेशन (RAC) चे तिकिट मिळते. आरएसीची सुद्धा मर्यादा संपल्यानंतर वेटिंगची तिकिट दिली जाते. आरएसी आणि वेटिंगचा आकडा हा त्या ट्रेनमधील एकूण सीटच्या आधारावर ठरवला जातो. मात्र आरएसीसह वेटिंग तिकिटाची सुद्धा एक मर्यादा असते. जी सर्व ट्रेनसाठी वेगवेगळी असते. त्यामुळे वेटिंग तिकिटाची निर्धारित मर्यादा संपते तेव्हा त्या ट्रेनचे तिकिट रिग्रेट होते. म्हणजेच त्या ट्रेनमसाठी आता रिजर्व्हेशन करता येऊ शकत नाही.
ट्रेनसाठी तिकिट बुकिंग करतेवेळी आरक्षण काउंटरच्या बुकिंग क्लर्क द्वारे कोडचा वापर केला जातो. त्याला NR असे म्हटले जाते. याचा अर्थ असा होतो की, तुम्हाला आता वेटिंग लिस्टचे सुद्धा तिकिट मिळणार नाही आहे.