Income Tax Return File | (Images for symbolic purposes only । Photo Credits: pixabay)

सध्या प्रत्येकजण बँकेत आपले खाते सुरु करत आहे. बँकेत बचत खात्यासह काही सुविधा सुद्धा दिल्या जातात. तर ग्राहकाने खात्यात जमा केलेल्या रक्कमेवर व्याज सुद्धा दिले जाते. बँक खात्यासह एफडी करण्याकडे लोक वळत आहेत. खरंतर ज्या लोकांना कोणत्याही रिस्क शिवाय गुंतवणूक करु इच्छितात ते लोक एफडीचा आधार घेतात. मात्र तुम्हाला माहिती आहे का, यावर मिळणाऱ्या व्याजावर टॅक्स द्यावा लागतो की नाही? जर तुम्हाला या बद्दल काही माहिती नसेल तर आम्ही तुम्हाला आज याच्या बद्दल अधिक सांगणार आहोत.

ज्यावेळी तुम्ही कोणत्याही बँकेत बचत खाते सुरु करता तेव्हा तुम्हाला व्याज मिळत राहते. मात्र बचत खात्यावक मिळणारे व्याज हे टॅक्स स्लॅबमध्ये येत नाही. म्हणजेच बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजावर कोणताही टॅक्स लागत नाही.(Alert! तीन दिवसानंतर बदलणार 'या' बँकेचे IFSC कोड, त्वरित बँकेला संपर्क करा)

परंतु एफडी अकाउंटवर मिळारे व्याज हे इनकम टॅक्सच्या स्लॅब मध्ये येतात. त्यामुळे तुम्हाला एफडीवर टॅक्स द्यावा लागतो. दरम्यान, ज्या लोकांनी एफडी सुरु केलीय त्यांना टॅक्स भरावा लागतो. यासाठी काही नियम असून प्रत्येक वर्षाला मिळणाऱ्या इंट्रेस्ट अमाउंटवर हे ठरविले जाते की. टॅक्स लावला जाणार आहे की नाही.(PAN-Aadhaar Linking Deadline: पॅन-आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ, अंतिम तारीख घ्या जाणून)

जर तुम्हाला एफडीवर प्रत्येक वर्षाला 40 हजार रुपयांपेक्षा अदिक व्याज मिळत असेल तर तुम्हाला टॅक्स भरावा लागतो. जर एफडी सीनियर सिटीझनच्या नावे असेल तर त्यांना 50 हजार रुपयापर्यंतच्या व्याजावर कोणताही टॅक्स भरावा लागत नाही. जेष्ठ नागरिकांसाठी एफडीवर अधिक इंट्रेस्ट रेट मिळतो आणि याचा अधिक फायदा सुद्धा त्यांना होतो.