PAN-Aadhaar Linking Deadline: पॅन-आधार लिंक करण्याच्या मुदतीत वाढ, अंतिम तारीख घ्या जाणून
PAN Card-Aadhar Card Link (File Photo)

पॅन कार्डला आधार कार्डशी लिंक (PAN-Aadhaar Linking) करण्याच्या मुदतीत तीन महिन्याची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत आधार आणि पॅन लिंक करता येणार आहे. याआधी ही मुदत 30 जून 2021 होती. आता ही मुदत वाढविल्याने करदात्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर (Anurag Thakur) यांनी ही महत्वाची घोषणा केली आहे. महत्वाचे म्हणजे, शासनाद्वारे निच्छित केलेल्या अंतिम मुदतीपर्यंत आधारशी न जोडलेले पॅनकार्ड निष्क्रीय होतील. त्यानंतर संबंधित व्यक्तिला आर्थिक व्यवहार करता येणार नाहीत. तसेच त्याला दंडदेखील भरावा लागणार आहे.

प्राप्तिकर अधिनियम, 1961 मध्ये जोडल्या गेलेल्या नवीन कलम 234 एच अंतर्गत पॅन आणि आधार न जोडल्यास 1000 रुपयांपर्यंत दंड करण्याची तरतूद करण्यात आली आहे. सरकारने हे वित्त विधेयक 2021 च्या माध्यमातून केले, जे लोकसभेने 23 मार्च रोजी मंजूर केले. प्राप्तिकर कायद्यात समाविष्ट केलेल्या नव्या तरतुदीनुसार, सरकार पॅन आणि आधार न जोडण्यासाठी लागणाऱ्या दंडाची रक्कम ठरवेल. हा दंड 1000 रुपयांपेक्षा अधिक नसेल. तसे, जर त्या व्यक्तीचा पॅन निष्क्रिय झाला तर, त्यावरही दंड करण्याची तरतूद आहे. महत्वाचे म्हणजे, जर तु्मचे पॅन कार्ड निष्क्रीय झाले तर तुम्हाला कायद्यानुसार पॅनकार्ड मिळालेच नाही असे मानले जाईल.

अशा परिस्थितीत तुम्हाला आयकर कायद्याच्या कलम 272 बी अंतर्गत 10000 रुपये दंड होऊ शकतो. हे देखील वाचा- 7th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांना उद्या मिळू शकते खुशखबर; महागाई भत्ता संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक

ट्वीट-

आयकर कायद्याच्या कलम 139 एए (2) नुसार ज्याच्याकडे 1 जुलै 2017 पर्यंतचे पॅन आहे आणि जो आधार कार्ड घेण्यासाठी पात्र आहे, अशा व्यक्तिला त्याच्या आधार कार्डचा क्रमांक आयकर अधिकाऱ्यांना सांगणे बंधनकारक आहे.