Alert! तीन दिवसानंतर बदलणार 'या' बँकेचे IFSC कोड, त्वरित बँकेला संपर्क करा
Bank (Photo Credit: PTI)

जर तुमचे सिंडिकेट बँकेत खाते असल्यास तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण सिंडिकेट बँकेचे 1 एप्रिल 2020 मध्ये कॅनरा बँकेत विलिकरण झाले आहे. यासाठी आता 1 जुलै पासून बँकेचे IFSC कोड बदलला जाणार आहे. अशातच सिंडिकेट बँकेचे आयएफसी कोड फक्त 30 जून पर्यंत वैध असणार आहेत. 1 जुलै 2021 पासून बँकेचे नवे IFSC कोड लागू होणार आहेत. सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना आता आपल्या बँकेच्या शाखेत जाऊन नवा IFSC कोड घ्यावा लागणार आहे.

कॅनरा बँकेने सुद्धा यासाठी त्यांच्या ग्राहकांना अलर्ट जाहीर केला आहे. बँकेने पुन्हा एकदा सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांसाठी जाहीरातीच्या माध्यमातून ही गोष्ट सांगितली आहे. कॅनेरा बँकेसोबत सिंडिकेट बँकेचे विलिकरण झाल्यानंतर SYNB सुरु होणारे सर्व eSyndicate IFSC बदलले आहे. SYNB पासून सुरु होणारे सर्व IFSC कोड हे 1 जुलै पासून डिसेबल होणार म्हणजेच काम करणार नाहीत.(RBI ने 31 डिसेंबर 2021 पर्यंत वाढवले PMC बॅंकेवरील निर्बंध)

बँकेने असे सुद्धा म्हटले की, ग्राहकांनी सर्व पैसे पाठवणाऱ्यांना सुचित करावे ती त्यांचे NEFT/RTGS/IMPS चा वापर करतेवेळी CNRB पासून सुरु होणाऱ्या नव्या IFSC कोडचा वापर करावा. तर नवा आयएफसी कोड प्राप्त करण्यासाठी ग्राहकांना कॅनरा बँकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागणार आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ऑगस्ट 2019 मध्ये कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँकेचे विलिकरण करण्याचे घोषित केले होते. त्यानंतर कॅनरा बँक आणि सिंडिकेट बँक मिळून देशातील सर्वाधिक मोठी चौथी बँक ठरली आहे.सरकारद्वारे या विलिगिकरणामुळे एकूण उद्योग 15.20 लाख कोटी रुपये होणार असल्याचा अनुमान लावण्यात आला आहे.