Air India च्या सर्व्हरवर सायबर हल्ला! 45 लाख प्रवाशांची क्रेडिट कार्डसह महत्त्वाची माहिती झाली गहाळ
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo credits: PTI)

भारतीय हवाई वाहतूक कंपनी एअर इंडियाचे (Air India) सर्व्हर हायजॅक झाले असून सायबर हल्ला करण्यात आला आहे. फेब्रुवारी 2021 शेवटच्या आठवड्यात हा सायबर हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 45 लाख लोकांची माहिती गहाळ झाली आहे. ही खूपच धक्कादायक बातमी असून यामुळे प्रवाशांची खाजगी माहिती ली झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या माहितीत प्रवाशांच्या नावासह जन्म तारीख, संपर्क क्रमांक, पासपोर्टवरील माहिती, क्रेडिट कार्डची माहिती यासह इतर माहिती चोरली गेली आहे.

एअर इंडियाच्या प्रवाशांची खाजगी माहिती गहाळ झाल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सायबर हल्ल्यामुळे सर्व्हरमधील 26 ऑगस्ट 2011 ते 3 फेब्रुवारी 2021 या कालावधीतील प्रवाशांची माहिती लीक झाली आहे. आमच्या मौल्यवान असलेल्या प्रवाशांना आम्ही सूचित करू इच्छितो की, डेटा सर्व्हवर सायबर हल्ला झाल्याची माहिती प्रवासी सेवा पुरवठा प्रणालीकडून मिळाली आहे. सध्या कंपनी डेटा प्रोसेसर प्रतिबंधात्मक उपाययोजना करत आहे. आम्ही प्रवाशांना त्यांची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड बदलण्यासाठी सांगत आहोत, असं एअर इंडियाने म्हटलं आहे.हेदेखील वाचा- New York: आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी Trump Organization चौकशीच्या फेऱ्यात

एअर इंडिया सध्या भारतातील आणि भारताबाहेर विविध एजन्सीच्या संपर्कात आहे. त्यांना या घटनेबद्दल माहिती देण्यात येत असल्याचं एअर इंडियानं म्हटलं आहे. हा डेटा SITA या सर्व्हरद्वारे चोरला गेला आहे. हा डेटा प्रोसेसर प्रवाशांच्या सेवेसाठी काम करतो. प्रवाशांचा डेटा साठवून ठेवण्याची आणि तो प्रोसेस करण्याची जबाबदारी त्याद्वारे होते. क्रेडिट कार्डबद्दलचा डेटा लीक झाला असला, तरी CVV नंबरच्या डेटाची चोरी झालेली नाही. हा सर्व्हर हॅक झाल्यानंतर त्याची सुरक्षितता वाढवण्यात आली आहे, असंही एअर इंडियाने म्हटलं आहे.