
देशभरात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) विरोधात लढण्यासाठी मोठ्या स्तरावर लसीकरण मोहिम पार पाडली जात आहे. आतापर्यंत 75 कोटी लसीकरण झाले असून वर्षाच्या अखेर पर्यंत तरुणांचे सुद्धा ते पूर्ण होईल अशी अपेक्षा केली जात आहे. याच दरम्यान एका अभ्यासाने चिंता वाढवली आहे. खरंतर आयसीएमआर-रीजनल मेडिकल रिसर्च सेंटर (भुवनेश्वर) यांना असे दिसून आले की, कोवॅक्सिन (Covaxin) आणि कोविशिल्ड (Covishield) लस घेतलेल्यांच्या शरिरात दोन-तीन महिन्यांनंतर अँन्टीबॉडीजचा स्तर कमी होऊ लागतो.
इंडिया टुडे सोबत बातचीत करताना डॉ. देवदत्त भट्टाचार्य यांनी असे म्हटले की, कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन लसीसाठी यामध्ये एकूण 614 जणांवर एक अभ्यास करण्यात आला. आम्ही त्यांच्यामध्ये अँडीबॉडीज तयार होत असल्याचे पाहिले आणि त्यांच्यावर सहा महिन्यांपर्यंत लक्ष ठेवले. ही एक दीर्घकाळ चालणाऱ्या अभ्यासाचा एक भाग आहे. खतंरत आम्ही दोन वर्ष अँन्टीबॉडीजवर नजर ठेवून असणार आहोत.(Saline Gargle RT-PCR Technique: नीरीने विकसित केले स्वदेशी 'सलाईन गार्गल आरटी-पीसीआर' तंत्र; विशेषतः ग्रामीण आणि आदिवासी भागात होणार फायदा)
पुढे त्यांनी असे म्हटले की, अभ्यासात आम्हाला असे दिसले कोवॅक्सिन लसीचे ज्या लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत त्यांच्यामध्ये दोन महिन्यानंतर अँन्टीबॉडीज कमी होऊ लागतात. तसेच कोविशिल्ड घेतलेल्यांमध्ये तीन महिन्यानंतर अँन्टीबॉडीज कमी होतात. या अभ्यासाचा उद्देश असा की, सार्स-सीओवी-2 (कोरोना व्हायरस) च्या विरोधात देण्यात येणाऱ्या लसीच्या अँन्टीबॉडीजबद्दल माहिती मिळवणे आहे.
अँन्टीबॉडीज मध्ये घट झाल्याने चिंता वाढल्यामुळे आयसीएमआर-आरएमआरसीचे डायरेक्टर संघमित्रा पती यांनी असे म्हटले की, जरी अँन्टीबॉडीजमध्ये घट होत असेल तरीही त्या राहतात आणि आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवून आहोत. आठ आठवड्यात यामध्ये घट दिसून आली. यासाठी आम्ही सहा महिन्यानंतर त्याला फॉलो करणार असून येत्या काळात ही त्याच्यावर नजर ठेवली जाणार आहे.
अँन्टीबॉडीजचे परिणाम दिसून आल्यानंतर सांगू शकतो की, बूस्टर डोसची गरज भासणार की नाही असे त्यांनी स्पष्ट केले. चाचणीसाठी सहभागी झालेल्या 614 जणांचे सीरमचे सॅम्पल एकत्रित केले. त्यांचे गुणात्मक आणि मात्रात्मक अशा दोन्ही रुपात SARS-CoV-2 अँन्टीबॉडीच्या परिक्षणासाठी दोन CLIA आधारित प्लॅटफॉर्मवर चाचणी करण्यात आली. या लोकांमधील 308 (50.2%) लोकांना कोविशिल्ड दिली गेली होती. तर 306 (49.8%) लोकांना कोवॅक्सिनची लस दिली गेली.