Coronavirus Vaccine (Photo Credits: ANI)

कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) विरोधात सुरु असलेल्या लसीकरणाच्या दरम्यान आता कोविशिल्ड लससाठी 12 आठवड्यांनंतरच अपॉइंटमेंट मिळणार आहे. केंद्राने रविवारी असे म्हटले की, कोविशिल्डचा दुसरा डोससाठी ऑनलाईन अपॉइंटमेंट 84 दिवसानंतरच मिळणार आहे. त्याचसोबत सरकारने असे म्हटले की, ज्या लोकांना कोविशिल्डचा दुसरा डोस घेण्यासाठी अपॉइंटमेंट घतेली आहे त्यांना कोणतीच समस्या येणार नाही आहे. परंतु ज्यांना अपॉइंटमेंट मध्ये बदल करायचा आहे ते करु शकतात.(काय सांगता? Covid-19 ला देवी समजून महिला करत आहेत 'कोरोना माई'ची पूजा; श्रद्धाळूंचा 21 दिवस पूजेचा संकल्प)

कोविशिल्ड लसीचे दोन डोस दरम्यानचा कालावधी लक्षात घेता कोविन पोर्टलमध्ये सुद्धा बदल केले जात आहेत. केंद्राने असे म्हटले की, कोविन डिजिटल पोर्टलवर जरुरी बदल करण्यात येत आहेत. त्यामुळे कोविशील्डच्या दोन डोसदरम्यान 12 ते 16 आठवड्यांचा कालावधी दाखवला जाऊ शकतो. कोविशील्डच्या दुसऱ्या डोससाठी आधीच बुक केलेली अपॉइंटमेंट मान्य असणार आहे. ती कोविन द्वारे रद्द केली जाणार नाही आहे.

काही महिन्यांपूर्वी असे झाले होते की, जेव्हा कोविशिल्ड लसीच्या दोन डोस दरम्यानचा कालावधी वाढवला गेला होता. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्च महिन्यात राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांना असे म्हटले होते की, दोन डोसच्या मधील वेळ 28 दिवस वाढवून 6 ते 8 आठवडे करावे.

दरम्यान, भारत सरकारने एका सरकारी पॅनलच्या सल्ल्यावर कोविशील्डचे दोन डोस लावण्यामधील कालावधी 6-8 आठवडे वाढवून 12-16 आठवडे करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गेल्या 13 मे रोजी या संबंधित घोषणा करत म्हटले की, विज्ञानाच्या आधारित निर्णय असून तो विश्वासासह घेतला आहे. यासाठी अतिरिक्त धोका सुद्धा उद्भवणार नाही आहे.(Sputnik V लसीनंतर भारतात लवकरच दाखल होणार Sputnik Lite; जाणून घ्या सिंगल डोस कोविड-19 लसीची खासियत)

मंत्रालयाने असे म्हटले होते की, नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुप ऑन इम्युनाइजेशनने कोवॅक्सिनच्या दोन डोस मधील अंतरात बदल करण्याचा कोणताच विचार केलेला नाही. यापूर्वी सीरम इंस्टिट्युट ऑफ इंडिया द्वारे निर्माण करण्यात आलेल्या कोविशिल्ड लसीच्या दोन डोस मधील अंतर सध्या 6-8 आठवडे होते. हैदराबाद येथे असलेली कंपनी भारत बायोटेक द्वारे देशात विकासित कोवॅक्सिन आणि ऑक्सफोर्ड-एस्ट्राजेनेकाचे डोस कोविशिल्डचे उत्पादन पुणे येथील सीरम इंस्टिट्युट द्वारे केले जात आहे. देशात लसीकरणासाठी दोन्ही लसींचा वापर केला जात आहे.