Covid-19 Vaccination | Photo Credits: Pixabay.com

भारतात कोविड-19 लसीकरणाचा (Covid-19 Vaccination) पहिला टप्पा 16 जानेवारीपासून सुरु झाला. या टप्प्यातील लसीचा दुसरा डोस देशभरातील आरोग्यसेवकांना आज (शनिवार, 13 फेब्रुवारी) दिला जात आहे. आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले की, 16 जानेवारी रोजी लसीकरण मोहिमेच्या शुभारंभादिवशी ज्यांना कोरोना लस देण्यात आली होती. त्यांना आज लसीचा दुसरा डोस देण्यात येत आहे. (COVID-19 Vaccination in India: कोविड-19 लसीकरणाचा तिसरा टप्पा मार्च महिन्यात सुरु होण्याची शक्यता- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन)

दिल्लीतील लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेजचे संचालक डॉ. एनएन माथुर म्हणाले की, "मी 28 दिवसांनी कोवाक्सिनचा दुसरा डोस घेतला आहे. मी एकदम ठीक आहे, मला शरीरात ताप किंवा वेदना यासारखे दुष्परिणाम झाले नाहीत. मी जनतेला सांगू इच्छितो की लस आता इतर कोविड लसीच्या तुलनेत सुरक्षिततेच्या मापदंडात पहिल्या स्थानावर आहे."

ANI Tweet:

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातील 55 टक्क्यांहून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. तर आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी शुक्रवारी लोकसभेत सांगितले की, या महिन्याच्या 2 तारखेपासून फ्रंटलाईन्स वर्कर्संना कोरोनाची लस देण्यात सुरुवात केली आहे. तसंच फ्रंटलाईन वर्कर्स आणि आरोग्यसेवकांना लस दिल्यानंतर इतर लोकांना कोविड-19 लस देण्यासंदर्भात राष्ट्रीय विशेषज्ञ दल निर्णय घेईल. (Covid-19 Vaccination in Maharashtra: महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण 6,08,570 जणांना देण्यात आली कोविड-19 लस)

देशव्यापी कोविड-19 लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत 79,67,647 आरोग्य सेवकांना आणि फ्रंटलाईन्स वर्कर्संना लस देण्यात आली आहे. 1,64,781 सत्रांद्वारे 79.67 लाखांहून अधिक लाभार्थींना कोरोना लस देण्यात येईल. यात 509,1356 स्‍वास्‍थ्‍य आरोग्यसेवक आणि 2,058,511 फ्रंटलाईन्स वर्कर्सचा समावेश आहे. दरम्यान, लसीकरणाच्या 28 व्या दिवसापर्यंत 10,411 सत्रांद्वारे 4,62,637 लाभार्थींना लस देण्यात आली होती. यात 94,160 आरोग्य सेवक आणि 3,68,477 फ्रंटलाईन्स वर्कर्सचा समावेश आहे.

सर्वात जास्त कोरोना लसीकरण झालेल्या 10 राज्यात उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, पश्चिम बंगाल, गुजरात, कर्नाटक, छत्तीसगड, झारखंड आणि ओडिशा यांचा समावेश आहे. शुक्रवारी, अधिकृत निवेदनात म्हटले आहे की आतापर्यंत एकूण 24 मृत्यूंची नोंद झाली आहे. हा आकडा एकूण लसीकरणाच्या 0.0003% इतका आहे. 24 पैकी 9 जणांचा रुग्णालयात मृत्यू झाला तर रुग्णालयाबाहेर 15 लोकांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दरम्यान, कोविड-19 लसी संबंधित एकही प्रतिकूल घटना समोर आलेली नाही.

20 फेब्रुवारीपर्यंत सर्व आरोग्य सेवकांना लस देण्यात यावी तर 1 मार्च 2021 पर्यंत फ्रंट लाईन वर्कटंना  लसीचा किमान एक तरी डोस मिळावा. विशेष 25 फेब्रुवारीपर्यंत वर्कर्संचे मोप-अप फेरी (अंतिम फेरी) अंतर्गत आरोग्य सेवक आणि फ्रंटलाईन वर्कर्स यांचे एकदा तरी लस देण्यात यावी.