देशासह राज्यात 16 जानेवारीपासून कोविड-19 लसीकरणाला (Covid-19 Vaccination) सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी (Health Workers) आणि फ्रंटलाईन वर्कर्स (Frontline Workers) यांना लस देण्यात येत आहे. दरम्यान, राज्यात आतापर्यंत एकूण 6 लाख 8 हजार 570 लोकांना कोरोना लस देण्यात आली आहे. कालच्या दिवसात सुमारे 34 हजार 900 नवीन आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्संना कोविड-19 लस देण्यात आली. (पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दुसऱ्या टप्प्यात मिळणार कोविड-19 लस- Reports)
काल राज्यात 3297 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळून आले. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या 20,52,905 इतकी झाली आहे. तर कालच्या दिवसात एकूण 6107 रुग्णांनी कोरोनावर मात गेल्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. दरम्यान, काल राज्यात 25 जणांचा कोरोना संसर्गामुळे मृत्यू झाला आहे. या नव्या अपडेटनंतर राज्यातील कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 19 लाख 70 हजारच्या पार गेली आहे. तर एकूण 30,265 जणांनी आपले प्राण गमावले आहेत.
ट्विट:
महाराष्ट्र में 6 लाख 8 हजार 570 लोगों को टीके लगे https://t.co/SpftMB2lXL
— आकाशवाणी समाचार (@AIRNewsHindi) February 12, 2021
मार्च महिन्यापासून कोविड-19 लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे. या टप्प्यात 50 वर्षांवरील व्यक्ती आणि 50 वर्षांखालील गंभीर आजार असलेल्या व्यक्तींचे लसीकरण होणार आहे. तर पहिल्या टप्प्यातील दुसरा डोस 13 फेब्रुवारी रोजी दिला जाणार आहे.
दरम्यान, भारतात ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अॅस्ट्रॅजेनेका निर्मित कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना आपात्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोविड-19 लसीकरणामध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती काही दिवसांपूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली होती.