Close
Search

COVID-19 Vaccination: भारतामध्ये पहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेतील दुसरा डोस 13 फेब्रुवारी पासून दिला जाणार

हे. 13 फेब्रुवारीपासूनपहिल्या टप्प्यात लस देण्यात आलेले कोविड योद्धे, आरोग्य कर्मचारी यांना दुसरा डोस दिला जाईल अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

बातम्या टीम लेटेस्टली|
COVID-19 Vaccination: भारतामध्ये पहिल्या टप्प्यातील लसीकरण मोहिमेतील दुसरा डोस 13 फेब्रुवारी पासून दिला जाणार
Covid-19 Vaccine | Representational Image | (Photo Credits: PTI)

भारतामध्ये 16 जानेवारीपासून कोविड 19 लसीकरण मोहिमेला सुरूवात झाली आहे. कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींना आपत्कालीन वापरासाठी मंजुरी देण्यात आल्यानंतर आता या लसीचा दुसरा डोस देण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. 13 फेब्रुवारीपासूनपहिल्या टप्प्यात लस देण्यात आलेले कोविड योद्धे, आरोग्य कर्मचारी यांना दुसरा डोस दिला जाईल अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. दरम्यान काल (4 फेब्रुवारी) दुपारी 1.30 वाजेपर्यंत देशात लस घेतलेल्यांचा आकडा 45,93,427 पर्यंत पोहचला आहे.

भारतामध्ये मध्य प्रदेश, केरळ, राजस्थान, सिक्कीम, त्रिपुरा, मिझोराम, लक्षद्वीप, ओडिशा, बिहार, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, अंदमान निकोबार या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये 50% पेक्षा अधिक आरोग्य कर्मचार्‍यांना लस देण्यात आली आहे. Dr KK Aggarwal यांनी एकट्याने कोविड-19 लस घेतल्याने नाखुश पत्नीने फोनवरच घेतला समाचार; व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पद्मश्री विजेत्या डॉक्टरांनी दिले 'हे' स्पष्टीकरण.

भारतामध्ये पहिल्या टप्प्यांत आरोग्य कर्मचारी, कोविड योद्धे, पोलिस यांना लस देण्यात आली आहे. देशात सध्या उपलब्ध असलेल्या लसींमध्ये प्रत्येकाला 2 डोस देणं आनिवार्य आहे. त्यामुळे फिला डोस घेतल्यानंतर आता दुसरा डोस घेऊनच हा कोर्स पूर्ण केला जाऊ शकतो आणि शरीरात कोरोना वायरस लसीविरूद्ध अ‍ॅन्टीबॉडीज तयार होण्यास मदत होईल असे सांगण्यात आल्यानंतर दुसरा डोस देखील घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.मीडीया रिपोर्ट्सनुसार देशात दुसर्‍या टप्प्यातील लसीकरणामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सारे खासदार, आमदार, मुख्यमंत्र्यांचा समावेश होणार आहे.

दरम्यान कोविड 19 च्या संकटामध्ये अद्यापही महाराष्ट्र आणि केरळ मध्ये रूग्णसंख्या अधिक असल्याचं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. सध्या भारताचा कोरोना पॉझिटीव्हिटी रेट हा  5% -6% च्या आसपास आहे. मात्र महाराष्ट्र आणि केरळ मिळून देशात 70% रूग्ण असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

 

शहर पेट्रोल डीझल
कोल्हापूर 106.06 92.61
मुंबई 106.31 94.27
नागपूर 106.63 93.16
पुणे 106.42 92.92
View all
Currency Price Change