COVID-19 Vaccination मध्ये भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर; देशात 57.75 लाखांहून अधिक लाभार्थींना देण्यात आली लस
Corona Vaccine | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

भारतात 16 जानेवारीपासून कोविड-19 लसीकरणाला (COVID-19 Vaccination) सुरुवात झाली आणि अवघ्या काही कालावधीत कोरोना लस दिलेला भारत हा जगातील तिसऱ्या क्रमांकाचा देश ठरला आहे. आरोग्य मंत्रालयाने (Ministry of Health and Family Welfare) दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 57.75 लाखांहून अधिक लाभार्थींना कोविड-19 लस देण्यात आली आहे. लसीकरण्याचा उत्पादनात देखील भारत अग्रेसर असून जवळपासच्या गरजू देशांना लस पुरवण्याचे कामही भारत करत आहे. आतापर्यंत 57,75,322 व्यक्तींना कोरोना व्हायरसची लस देण्यात आली आहे.

50 लाख लोकांना कोरोना विरुद्ध लस देणारा भारत हा सर्वात वेगवान देश ठरल आहे. हा उच्चांक अवघ्या 21 दिवसांत गाठला आहे. काही देशांमध्ये 60 हून अधिक दिवसांपासून लसीकरण सुरु असूनही ते या टप्प्यापर्यंत पोहचललेले नाहीत.  भारताने लसीकरणासोबतच लसीच्या उत्पादनासाठी आणि त्याच्या वितरणासाठी चांगली योजना आखली आहे. या लसीसाठी आफ्रीका, आशिया आणि काही युरोपीय देशांकडून मागणी होत आहे. (COVID-19 Vaccination in India: कोविड-19 लसीकरणाचा तिसरा टप्पा मार्च महिन्यात सुरु होण्याची शक्यता- केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन)

ANI Tweet:

भारतामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे प्रमाण कमी होत चालले असून रविवारी मिळालेल्या रिपोर्टनुसार, गेल्या 24 तासांत 12,059 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. तर 78 जणांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या 1,54,996 इतकी झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 16 जानेवारीला लसीकरण मोहिमेला सुरुवात केली असून देशामध्ये होणाऱ्या मृतांचे प्रमाण कमीत कमी करुन कोरोना व्हायरस पूर्णपणे नष्ट करणे, हा यामागील उद्देश आहे. काही दिवसांपूर्वीच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका निर्मित कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन यांना आत्पातकालीन वापरासाठी परवानगी दिली होती. भारतातील सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडिया हे कोविशिल्डचे उत्पादन करत असून भारत बायोटेकतर्फे कोवॅक्सिनचे उत्पादन सुरु आहे.