GDP | (Photo Credits: Pixabay | Archived, edited, symbolic images)

कोरना व्हायरस (Coronavirus) संकटाचा आवघे जग सामना करत आहे. हे संकट आणि त्याचे परिणाम भारतावरही स्पष्ट दिसत आहेत. भारताच्या जीडीपी (GDP) दराच्या रुपात हे परिणाम अधिक ठळक झाले आहेत. जे केंद्र सरकारने शुक्रवारी (29 मे 2020) दिलेल्या आकडवारीतून पुढे आले. केंद्र सरकारने दिलेल्या आकडेवारीनुसार, यंदाच्या आर्थिक वर्षात (2019-20) सकल राष्ट्रीय उत्पन्न (Gross Domestic Product) वाढीचा दर हा चौथ्या तिमाहीत घटला असून तो 3.1% इतका राहिला आहे. सरकारने पुढे म्हटले आहे की, 2019-20 मध्ये देशाचा विकारसर 4.2% इतका राहिला. जो 2018-19 मध्ये 6.1% इतका होता.

कोरोना व्हायरस संकट आणि लॉकडाऊन आदी कारणांमुळे देशभरातील विविध उद्योग व्यवसाय पूर्णपणे ठप्प राहिले. त्यामुळे एप्रिल 2020 मध्ये एक वर्षापूर्वीचे बर्क्स रेकॉर्ड 38.1% घटले आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार देशातील प्रमुख आठ उद्योगांच्या उत्पादनात गेल्या वर्षीच्या एप्रिल महिन्यात 5.2% इतकी वाढ झाली होती.

दरम्यान, या आधी मार्च महिन्यात प्रमुख आठ उद्योगांमधील म्हणजेच कोळसा, कच्चे तेल, नैसर्गिक गॅस, रिफायनरी उत्पादन, खते, सिमेंट, स्टील आणि वीज यांमध्ये 9% घसरण पाहायला मिळाली. अर्थमंत्रालयाच्या सांगण्यानुसार, कोविड19 महामारिमुळे एप्रिल 2020 मध्ये देश ठप्प झाला. त्यामुळे सिमेंट, स्टील, नैसर्गिक गॅस, रिफायनरी, कच्च्या तेलासह सर्व मूलभूत उद्योगांचे उत्पादन घटले आहे. (हेही वाचा, Recession in India: लॉक डाऊनमुळे भारतात स्वातंत्र्यानंतरची चौथी सर्वात मोठी आर्थिक मंदी; चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेत 5 टक्के घट- CRISIL)

कोविड कोविड 19 वर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने 25 मार्च रोजी लॉकडाऊन जाहीर केले होते. परंतु जानेवारी ते मार्च या काळात जगभरातील आर्थिक यंत्रणा ठप्प राहिल्या. भारतीय अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम झाला. भारतीय रिझर्व्ह बँकेने 2019-20 मध्ये आर्थिक वाढीच्या दराचा अंदाज पाच टक्के इतका राहील असा अंदाज व्यक्त केला होता. तर एनएसओने यंदाही जानेवारी-फेब्रुवारीमध्ये पाच टक्के वाढीचा अंदाज वर्तविला होता. दरम्यान, कोरोना विषाणूच्या साथीमुळे जानेवारी-मार्च 2020 मध्ये चीनची अर्थव्यवस्था 6.8 टक्क्यांनी घसरली.