सियाचिन: भारतीय लष्करातील जवानांना पुरेसे जेवण, कपडेही नाहीत; कॅगचा अहवाल
Indian Army soldiers deployed in Siachen (Photo Credits: ANI)

सियाचिन आणि लद्दाख येथे तैनात असलेल्या भारतीय लष्करातील जवानांबाबत धक्कादायक माहिती पुढे येत आहे. जमीनीपासून अधिक उंचीवर असलेल्या ठिकाणी कर्तव्य बजावणाऱ्या सैनिकांना चक्क जेवण आणि कपड्यांसाठीही मोठी तडजोड करावी लागत आहे. या सैनिकांना आवश्यक कपडे, चश्मे, बूट आणि जेवण तसेच इतर सामग्री पुरेशा प्रमाणात मळत नाही. केंद्रीय नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (Comptroller and Auditor General) अहवालात ही माहिती पुढे आली आहे. कॅगच्या अहवालात (CAG Report) असेही म्हटले आहे की, साधनसामग्रीचा अभाव असल्याने या सैनिकांना वस्तुंचा पुनर्वापर (रिसाइकल्ड वर्जन ) करावा लागत आहे.

कॅगच्या अहवालात म्हटले आहे की, या जवानांना (खास करुन सियाचिन आणि लद्दाख येथे कर्तव्यावर असणाऱ्या) पुरेशा प्रमाणात राशन मिळत नाही. या धक्कादायक प्रकारामुळे जवानांना आवश्यक असलेल्या कॅलरीजच्या तुनलेत त्या 82 टक्के कमी आढळल्या आहेत. कॅगचा हा अहवाल लोकसभेत सादर करण्यात आला आहे. अर्थसंकल्पात संरक्षणासाठी आवश्यक असलेली निधीची तरतूद कमी असल्याने अधिक उंचीवर कर्तव्य बजावणाऱ्या जवानांसाठी आवश्यक कपड्यांची आणि साधनसामग्रीची खरेदी मर्यादित खरेदी करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

या अहवालात असेही म्हटले आहे की, अधिक उंचीवर असलेल्या प्रदेशात कर्तव्य बजावत असलेल्या जवानांसाठी निवास व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी सुरु करण्या आलेला पायलट प्रोजेक्ट फारसा यशस्वी झाला नाही. निवास व्यवस्था अधिक चांगली करण्यासाठी देण्यात आलेली सेवा त्यांच्या तुकडीपर्यंत पोहोचविण्यास एक वर्षांपेक्षाही अधिक विलंब झाला आहे. कॅगच्या अहवालात म्हटले आहे की, नॉर्दन कमांडचेआर्मी हेडक्वार्टर रिजर्व ज्या ठिकाणी डेपोमध्ये एक्सट्रीम कोल्ड क्लोदिंग एंड इक्विपमेंट (ईसीसीएंडई) ठेवण्यात येते. (हेही वाचा, Defence Expo 2020: उद्यापासून लखनऊमध्ये सुरू होणार आशियातील सर्वात मोठा डिफेंस एक्स्पो; संपूर्ण जगाला दिसेल भारतीय सैन्याचे शौर्य)

इसीसीएंडईमध्ये जवानांचे बूट, कोट, चश्मे आणि स्लीपिंग बॅग आदी साधनांचा समावेश होतो. याचा वापर ईस्टर्न कमांडमध्ये 9000 फूट आणि दुसरे कमांड 6000 फूट पेक्षाही अधिक उंचीवर जाणाऱ्या ठिकाणी होतो. संरक्षण मंत्रालयाने गेल्या वर्षी कॅगला सांगितले होते की, आर्थिक निधीच्या कमतरतेमुळे ही खरेदी कमी प्रमाणात झाली. ऑडिटमध्ये हेही म्हटले आहे की, ईस्टर्न कमांडच्या दोन डेपोमध्ये ईसीसीएंडई आयटम्सची संख्याही मोठ्या प्रमाणावर कमतरता होती.