भारतीय लष्करातील तीन अधिकारी तातडीने बडतर्फ करण्यात आले आहेत. ब्राह्मोस क्षेपणास्त्र (Brahmos Missile) नजरचुकीने पाकिस्तानमध्ये डागल्याने (Accidental Missile Firing) या तिघांवर ही कारवाई करण्यात आली आहे. केंद्र सरकारने ही माहिती मंगळवारी दिली. एका अधिकाऱ्याने प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, कोर्टाच्या चौकशीदरम्यान आढळून आले की, दुर्घटनाग्रस्त क्षेपणास्त्र ब्राह्मोस डागले जाण्याबद्दल तिन्ही अधिकाऱ्यांनी मानक कार्य पद्धती (Standard Operating Procedures) अवलंबली नाही. त्यांनी 9 मार्च रोजी ब्राह्मोस डागले. हे क्षेपणास्त्र पाकिस्तानात गेले.
हवाई दलाने आपल्या प्रतिक्रियेत सांगितले की, ब्राह्मोस क्षेपणास्त्र नजरचुकीने 9 मार्च 2022 रोजी डागण्यात आले होते. या घटनेसाठी जबाबदारी निश्चित करण्यासाठी या प्रकरणाची चौकशीसाठी गठित कोर्ट ऑफ एनक्वायरीमध्ये आढळून आलेकी, या अधिकाऱ्यांनी मानक कार्य पद्धतीचे (SOP) पालन केले नाही. या एक्सिडेंटल फायरींगमध्ये तीन अधिकारी सहभागी होते.
अधिकाऱ्यांच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, या घटनेला प्रामुख्याने तीन अधिकाऱ्यांना जबाबदार ठरविण्यात आले आहे. केंद्र सरकारने अत्यंत तातडीने या तिघांची सेवा संपुष्टात आणली आहे. 23 ऑगस्ट 2022 रोजी अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संरक्षण मंत्रालयाने या घटनेला अत्यंत खेदजनक असल्याचे सांगत तांत्रिक चुकीला जबाबदार धरले आहे. (हेही वाचा, Russia-Ukraine War: युक्रेनमध्ये Dnipropetrovsk प्रदेशात रशियाचा रात्रभर बॉम्बवर्षाव, 21 ठार; गव्हर्नर Valentyn Reznichenko यांची माहिती)
पाकिस्तानच्या माहितीनुसार, हे क्षेपणास्त्र पाकिस्तानच्या हवाई हद्दीत 100 किमी आत आले. त्या वेळी 40 हजार फूट उंचीवर आणि ध्वीच्या वेगापेक्षी तिप्पट वेगाने या क्षेपणास्त्राने वेग धारण केला होता. कारण यात कोणताही वॉरहेड नव्हता. त्यामुळे याचा स्फोट झाला नाही.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2019 नंतर संबंध अधिक ताणले गेले आहेत. जेव्हा जम्मू-कश्मीरमधील पुलवामा मध्ये दहशतवाद्यांनी आत्मघातकी हल्ला केला होता. त्यात भारतीय जवान मारले गेले होते. या हल्ल्याच्या प्रत्युत्तरादाखल भारताने पाकिस्तानच्या बालाकोटमध्ये एअर स्ट्राईक केला. या वेळी भारत आणि पाकिस्तान यांच्यात संघर्ष निर्माण झाला होता.