रशिया (Russia) युक्रेन (Ukraine) यांच्यीतल युद्ध अद्यापही थांबले नाही. रशियाकडून युक्रेनवर होणारा बॉम्ब वर्षाव अद्यापही सुरुच आहे. रशियाने दनिप्रोपेत्रोवस्क (Dnipropetrovsk ) प्रदेशात काल रात्रभर केलेल्या बॉम्बवर्षावात युक्रेनचे 21 नागरिक ठार झाल्याचे वृत्त आहे. एका वृत्तसंस्थेच्या हवाल्याने प्रसारमाध्यमांनी हे वृत्त दिले आहे. गव्हर्नर वॉलेनटन रेजनीचेंको ( Valentyn Reznychenko) यांनीही या वृत्ताला दुजोरा दिल्याचा दावा आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, दनिप्रोपेत्रोवस्क प्रदेशातीलनिकोपोल जिल्ह्यात झालेल्या बॉम्बवर्षावात 11 नागरिक ठार झाले आणि मार्गान्ट्स (Marganets) येथे 10 नागरिक मृत्यू पावले. टेलीग्रामच्या माध्यमातून दिलेल्या संदेशात ही माहिती त्यांनी दिली.
दक्षिण अफ्रिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांनी म्हटले आहे की, रशिया आणि युक्रेनमध्ये चाललेल्या युद्धात आमच्या देशाला कोणाच्या तरी एकाच बाजुला या असा दबाव टाकणे हे स्वीकारार्ह नाही. आंतरराष्ट्रीय संबंंध आणि सहकार्य मंत्री नालेनी पांडोर यांनी दक्षिण अफ्रीकेच्या तीन दिवसीय यात्रेत अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्री एँटनी ब्लिंकन यांचे स्वागत केले आहे. अभ्यासकांचे मत असे की, ब्लिंकन यांचा हा दौरा चीन आणि रशियाच्या वाढत्या जवळीकीला कमी करण्यासाठी आयोजित करण्यात आला आहे. रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव हे पाठिमागच्या महिन्यातच दक्षिण आफ्रिकेला आले होते. (हेही वाचा, Nancy Pelosi Taiwan Visit: 'अमेरिकेला भोगावे लागतील परिणाम', नॅन्सी पेलोसी यांच्या तैवान भेटीवरून चीनचा कडक इशारा (Watch Video))
पांडोर यांनी म्हटले की, ते याबद्दल खुश आहे की, ब्लिंकन यांनी अमेरिकेने दक्षिण अफ्रिकेच्या कोणतीही बाजू (रशिया किंवा युक्रेन) न घेण्याबद्धल कौतूक केले आहे. दरम्यान, युक्रेनवर आक्रमण केल्यावर अमेरिका आणि दक्षिण आप्रिका यांच्यात तटस्थ धोरण स्वीकारल्याबद्दल काहीसा ताण आहे.