Lockdown मध्ये IRCTC ऑनलाईन रेल्वे बुकिंग सुरु करताच पहिल्याच दिवशी झाले 16 कोटींच्या वर झाले कलेक्शन
IRCTC Website Shut (Photo Credits: File Photo)

देशात कोरोना व्हायरस (Coronavirus) मुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण वाहतूक सेवा बंद करण्यात आली होती. त्यामुळे रेल्वे बुकिंगही बंद ठेवण्यात आले होते. सोमवारी IRCTC चे ऑनलाईन रेल्वे बुकिंग सरु करण्यात आले आहे. पहिल्याच दिवशी IRCTC च्या ऑनलाईन साइटवरुन 82,317 प्रवाशांचे बुकिंग करण्यात आले. नागरिकांसाठी सोडण्यात आलेल्या स्पेशल रेल्वे साठी हे बुकिंग सुरु करण्यात आले आहे. यातून काल पहिल्याच दिवशी रेल्वे प्रशासनाकडे 16 कोटी 15 लाख 63 हजार 821 रुपये जमा झाले.

लॉकडाऊन वाढतच चालल्यामुळे अनेकांना आपल्या घराकडे जाण्याची ओढ लागली आहे. अनेकजण मे महिन्यात आपल्या गावाला जातात. मात्र यंदा कोरोना व्हायरस आणि त्यात आलेल्या लॉकडाऊन मुळे या नागरिकांच्या आनंदावर विरजण पडले आहेत. त्यात लॉकडाऊन मुळे आपल्या घरापासून दूर कामानिमित्त आलेले नागरिक अडकून पडले आहेत. या लोकांसाठी भारतीय रेल्वेने विशेष रेल्वे सेवा सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रात्री 8 वाजता देशाला संबोधित करणार; Lockdown बाबत महत्त्वाची घोषणा करण्याची शक्यता

रेल्वे मंत्रालयाने नागरिकांना येत्या 12 मे पासून 15 पॅसेंजर ट्रेन सुरु होणार असल्याची घोषणा केल्यावर आयआरसीटीच्या वेबसाईट्सवर रेल्वे तिकिट बुकिंग ऑनलाईन पद्धतीने सुरु करण्यात आले होते. परंतु नागरिकांकडून तिकिट बुकिंग करण्याचा प्रयत्न केला जात असून तिकिट बुक होत नसल्याने ट्वीटरवर त्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर 15 पॅसेंजर ट्रेनसाठी 4 वाजल्यापासून तिकिट बुकिंग सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानंतर 6 वाजता सुविधा पुन्हा सुरु झाली.